याप्रसंगी देवरी तालुका काँग्रेस अध्यक्ष संदीप भाटीया, जि.प.च्या माजी सदस्य माधुरी कुंभरे, आमगाव तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष छबू ऊके, सरपंच कल्पना गोस्वामी, अर्चना नरवरे, किरण राऊत, पूजा कटकवार, सरपंच धनश्री गंगासागर, सरपंच मीरा कुंजाम, उपसरपंच प्रमिला गावळ, आनंद अत्तरगडे, सरपंच कविता वालदे, सरपंच लीला मुंदी, फुलवंता बगडेरीया, देवरी तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष सुभ्रदा अगडे, कला सरोटे, सरपंच प्रमिला घासले, जसवंता भारप्राज, निशा परिहार उपस्थित होत्या. यावेळी संदीप भाटीया, छबू उके, उषा शहारे, उषा मेंढे व सीमा कोरोटे यांनी मार्गदर्शन केले. महिलांना हळदी-कुंकू लावून वाण वाटप करण्यात आले. यावेळी महिलांसाठी संगीतखुर्ची व उखाणे स्पर्धा घेण्यात आल्या. विजयी स्पर्धकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन चिचगडच्या ग्रा.पं.सदस्य अरमिता राऊत यांनी केले. आभार महिला काँग्रेस अध्यक्ष सुभद्रा अगडे यांनी मानले. यावेळी शाईन सैयद, सीमा राऊत, सुनीता नंदागवळी, राधिका धरमगुळे, वत्सला लटये, निता कोल्हारे, नसीमा शेख, किरण राऊत, प्रीती सलामे, सुमन सलामे, लक्ष्मी धानगाये, पूृजा कोल्हारे, शोभा तोमर, अस्मिता धानगाये, ममता कोल्हारे यांच्यासह देवरी व चिचगड क्षेत्रातील महिला काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हाेते.
चिचगड येथे महिला मेळावा उत्साहात ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:46 IST