शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
5
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
6
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
7
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
8
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
9
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
10
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
11
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
12
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
13
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
14
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
15
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
16
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
17
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
18
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
19
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
20
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा

भाजपात उत्साह, राष्ट्रवादीत रस्सीखेच

By admin | Updated: June 11, 2014 23:17 IST

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत गोंदिया जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघांपैकी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला मताधिक्य देणारा तिरोडा हा एकमेव मतदार संघ आहे.

नितीन आगाशे - तिरोडानुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत गोंदिया जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघांपैकी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला मताधिक्य देणारा तिरोडा हा एकमेव मतदार संघ आहे. तरीपण मताधिक्यातील फरक गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी बराच कमी झाला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत याचे पडसाद उमटतील का? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.तिरोडा विधानसभा क्षेत्र हे १९६२ ते १९९० पर्यंत काँग्रेसचा गड राहिले आहे़ याला अपवाद फक्त १९८५ ची निवडणूक अपवाद होती. २००९ च्या निवडणुकीत मात्र पहिल्यांदाच भाजपाचे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते डॉ.खुशाल बोपचे यांनी अवघ्या ६२३ मताधिक्याने ही निवडणूक जिंकून तिरोडा विधानसभेवर भाजपाचा झेंडा रोवला. हा मतदार संघ १९७८ पासून २००४ पर्यंत अनुसूचित जाती वर्गाकरीता आरक्षित होता़ सुमारे ३१ वर्षांनंतर आरक्षणमुक्त झाल्यामुळे या क्षेत्रात बहुसंख्य असलेल्यापोवार समाजाला संधी मिळाली़ तसे पहिले असता दिलीप बन्सोड आमदार असताना तत्कालिन केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या सहकार्यामुळे तिरोडा विधानसभा क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणात विकास कार्ये झालीत. त्यांची कारकीर्दही चांगली मानली जाते़ मात्र २००४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आरक्षणमुक्तीच्या मुद्यावर त्यांना पुन्हा संधी देऊ शकला नाही़ परिणामी गेल्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला थोड्या फरकाने ही जागा गमवावी लागली.यावेळच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रफुल्ल पटेलांना फक्त तिरोडा विधानसभा क्षेत्रात थोडे का होईना मताधिक्य आहे़ नगर परिषद क्षेत्र राष्ट्रवादीला अनुकून दिसून येते़ नगर पालिकेत १७ पैकी १५ नगरसेवक राष्ट्रवादीचे आहेत़ लोकसभा निवडणुकीतील यश व केंद्रातील भाजपाचे सरकार पाहता भाजपाचे नेते व कार्यकर्ते अतिशय उत्साहात आहेत़ मात्र आ़. खुशाल बोपचे यांचे वास्तव्य गोरेगाव येथे असल्याने आणि ते तिरोडा येथे जास्त वेळ देऊ शकत नसल्याने कार्यकर्ते काहीसे दुरावल्याचे दिसून येते. तुलनात्मकदृष्टया त्यांची कारकीर्द समाधानकारक मानली जात नाही़ ते विरोधी पक्षाचे आमदार असणे हे देखील कारण असू शकते़ तरीसुद्धा भाजपाकडून त्यांची दावेदारी मजबुत मानली जाते़ पक्षश्रेष्ठींनी चेहरा बदलविण्याचे ठरविल्यास त्यांचे पूत्र व भाजयुमोचे पदाधिकारी रविकांत उर्फ गुड्डू बोपचे यांना या मतदार संघात उतरविले जाण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. याशिवाय जि़प़ बांधकाम समितीचे माजी सभापती विजय रहांगडाले, माजी जि.प.उपाध्यक्ष पंचम बिसेन हे दावेदार मानले जातात.राष्ट्रवादीतून माजी आ.दिलीप बन्सोड, डॉ.सुशील रहांगडाले, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष व जि.प.सदस्य राजलक्ष्मी तुरकर हे दावेदार आहेत. यात गतवेळी अवघ्या ६२३ मतांनी पराभव पत्करल्यामुळे डॉ.रहांगडाले दावा करीत आहेत. एक महिला उमेदवार म्हणून संधी मिळण्यासाठी राजलक्ष्मी तुरकर प्रयत्नशील आहेत तर मतदार संघात सदैव सक्रिय राहात असल्यामुळे दिलीप बन्सोड यांची दावेदारी प्रबळ मानली जाते. या ठिकाणी दुसऱ्याला उमेदवारी दिल्या गेली तर या तिघांपैकी एक जण बंडखोरी करण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. तालुक्यात बसपासह शिवसेना-मनसेचे अस्तित्व फारसे राहिलेले नाही. त्यामुळे त्यांच्याकडून दावेदारी करण्यास अजूनही कोणीही पुढे आलेले नाही.