शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेची चावी अपक्षांच्या हाती

By admin | Updated: July 31, 2014 00:05 IST

येत्या ६ आॅगस्ट रोजी होऊ घातलेल्या गोंदिया नगर पालिकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी सत्ताधारी काँग्रेस-राकाँसह भाजप-सेनेने चांगलीच कंबर कसर आहे. मात्र आपला एकही

नगराध्यक्षपदाची निवडणूक : एका भाजप नगरसेवकासह दोन अपक्षही संपर्कात?गोंदिया : येत्या ६ आॅगस्ट रोजी होऊ घातलेल्या गोंदिया नगर पालिकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी सत्ताधारी काँग्रेस-राकाँसह भाजप-सेनेने चांगलीच कंबर कसर आहे. मात्र आपला एकही नगरसेवक सत्ताधाऱ्यांच्या गळाला लागू नये म्हणून भाजपने सर्वांना राजस्थानच्या सहलीवर पाठविले असले तरी एक नगरसेवक अजूनही त्यांच्यासोबत नसल्याचे बोलले जाते. दुसरीकडे अपक्षांना आपल्याकडे ओढण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू असून दोन अपक्ष उमेदवार सध्या अज्ञातवासात असल्याचे बोलले जाते. त्यामुळे निवडणुकीची रंगत आणखीच वाढणार आहे.येत्या ६ आॅगस्टला विद्यमान नगराध्यक्ष-उपाध्यक्षांचा कार्यकाळ संपत आहे. त्याच दिवशी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया घेण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या या निवडणुकीत काँग्रेसच्या गोटातील तीन नगरसेवकांना अपात्र ठरविल्यामुळे या निवडणुकीतील चुरस आणखीच वाढली आहे. भाजपसाठी नगर परिषदेची सत्ता आता अगदी हातभर अंतरावर आहे. मात्र विधानसभा निवडणुकीच्या रणनितीसाठी नगर परिषदेची सत्ता हातातून गमावणे काँग्रेससाठी मोठे जड जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सत्ता टिकविण्यासाठी काँग्रेसकडून आणि सत्ता बळकावण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. अडीच वर्षापूर्वी ज्या दोन अपक्षांना हाताशी घेऊन काँग्रेस-राकाँने नगर परिषदेवरील सत्ता कायम ठेवली होती त्या अपक्षांना सोबत घेऊनही यावेळी सत्तास्थापनेसाठी त्यांचे संख्याबळ एका सदस्याने कमी पडत आहे. त्यामुळे भाजपमधील एक नगरसेवक आपल्याकडे ओढल्याशिवाय पुन्हा सत्तेत राहणे शक्य नसल्यामुळे त्यादृष्टीने ते प्रयत्नरत आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांना राजस्थानच्या सहलीवर पाठविण्यात आले आहे.२४ जुलै रोजी भाजपचे १२ सदस्य राजस्थानकडे रवाना झाले आहेत. त्यानंतर उर्वरीत चार सदस्यांपैकी तीन सदस्यही रवाना झाले. परंतू एक सदस्य अजूनही सहलीवर गेला नसल्याची कुजबूज सुरू आहे. त्यामुळे तो सदस्य काँग्रेस-राकाँच्या गळाला तर लागला नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.दुसरीकडे दोन अपक्षांंना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. विशेष म्हणजे सत्तेत उपाध्यक्षपद किंवा सभापतीपद मिळण्याच्या आशेने हे दोन्ही सदस्य आपल्याकडे येतील असा विश्वास भाजपला वाटत आहे. त्यामुळे नगर परिषदेत सत्तेची चावी अपक्षांच्या हाती असल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येते. नगराध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवडणूक शेवटी कोणाच्या पथ्थ्यावर पडते हे अखेरपर्यंत गुलदस्त्यात राहणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)