शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

कचारगड यात्रेसाठी कमाला लागली यंत्रणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 22:17 IST

१७ फेबु्रवारी पासून सुरु होत असून यात्रेची तयारी करण्याच्या दृष्टीकोनातून तसेच सतत १० दिवस भाविकांना कोणकोणत्या सोयी सुविधा देण्यात याव्यात, त्यांच्या सुरक्षीत यात्रेसाठी कोणती दक्षता घेतली जावी या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी आमदार परिणय फुके यांच्या अध्यक्षतेत व आमदार संजय पुराम यांच्या प्रमुख उपस्थितीत धनेगाव येथील सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली.

ठळक मुद्देधनेगाव येथे आढावा बैठक : आमदार फुके व पुराम यांनी केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : १७ फेबु्रवारी पासून सुरु होत असून यात्रेची तयारी करण्याच्या दृष्टीकोनातून तसेच सतत १० दिवस भाविकांना कोणकोणत्या सोयी सुविधा देण्यात याव्यात, त्यांच्या सुरक्षीत यात्रेसाठी कोणती दक्षता घेतली जावी या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी आमदार परिणय फुके यांच्या अध्यक्षतेत व आमदार संजय पुराम यांच्या प्रमुख उपस्थितीत धनेगाव येथील सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली.या बैठकीला मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ.ए.राजा दयानिधी, उपजिल्हाधिकारी अशोक लटारे, जि.प. सदस्य दुर्गा तिराले, पं.स.सभापती अर्चना राऊत, विरेंद्र अंजनकर, शंकर मडावी, विनोद अग्रवाल व वरिष्ठ पदाधिकारी आणि जिल्हा व तालुका स्तरावरील प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. तत्पुर्वी सर्व पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी धनेगाव ते कचारगड पर्यंत पायी चालत जत्रा स्थळापासून कचारगड देवस्थानापर्यंत निरीक्षण करून कोणत्या ठिकाणी काय काय व्यवस्था केली जावी याची पाहणी केली.सालेकसा तालुक्यात छत्तीसगड, मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या कचारगडला आदिवासी समाजाचे उगमस्थळ मानले जात असून या ठिकाणी संपूर्ण आदिवासी समाज श्रद्धेने येवून नमन करुन जातो. आद्य पोर्णिमेनिमित्त आपल्या पूर्वजाला नवस फेडण्यासाठी दरवर्षी येथे सुमारे पाच ते सहा लाख भाविक येत असतात. त्या लाखो भाविकांना पुरेशा सोयी सुविधा पुरविणे एक मोठे आवाहन असते. अशात स्थानिक कचारगड देवस्थान समितीसोबत प्रशासन व शासन स्तरावर हातभार मिळणे गरजेचे असते. यासाठी जिल्हा प्रशासन आवश्यक त्या सोयी उपलब्ध करुन देण्याचा पुरेपूर प्रयत्न करते.कचारगड येथे आशिया खंडाची सर्वात मोठी गुफा असून या ठिकाणी आदिवासी क्षेत्रात असलेल्या या निसर्गरम्य परिसरावर आदिवासींची मोठी श्रद्धा असल्याबरोबरच प्राकृतीक पर्यटन स्थळाच्या रुपात सुद्धा हे स्थळ इतर पर्यटकांना सुद्धा आकर्षित करीत असते. अशात कचारगड यात्रेला व्यापक प्रतिसाद मिळत असते. आ परिस्थितीत चाक चौबंद सुरक्षा व्यवस्था, पिण्याचे पाणी, सीसीटीव्ही कॅमेरे, भोजन व्यवस्था, आरोग्य सुविधा, सुकूर रस्ते, प्रवास साधन, निवास व्यवस्था, स्नानगृह, शौचालय अशा मुलभूत सोयी कशा प्रकारे पुरविण्यात येतील याबाबत सविस्तर चर्चा करुन संबंधित विभागाला आवश्यक निर्देश देण्यात आले. पारी कोपार लिंगो मा काली कंकाली कचारगड देवस्थान समितीला पुरेपूर सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

टॅग्स :Kacharagarh templeकचारगड देवस्थानParinay Fukeपरिणय फुके