गोंदिया : जिल्हा परिषद आणि आठही पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी आरक्षण जाहीर झाले असताना जिल्ह्यातील १९३ ग्रामपंचायतींनाही निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा तयारीला लागली आहे.जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा कार्यकाळ येत्या जुलै महिन्यात संपणार असल्यामुळे जून महिन्याच्या अखेरपर्यंत या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यापाठोपाठ आॅगस्ट ते सप्टेंबर २०१५ या कालावधीत १९३ ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. त्यामुळे या सर्व ग्रामपंचायतींची निवडणूक एकाचवेळी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपाठोपाठ यासुद्धा निवडणुका होण्याची शक्यता आहे.निवडणुकीचे वेध लागलेल्या या ग्रामपंचायतींमध्ये गोंदिया तालुक्यातील सर्वाधिक ३७ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. याशिवाय तिरोडा तालुक्यातील १९, गोरेगाव तालुक्यातील २६, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील २९, देवरी तालुक्यातील २९, आमगाव तालुक्यातील २४, सालेकसा तालुक्यातील १० आणि सडक अर्जुनी तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. (जिल्हा प्रतिनिधी)या ग्रामपंचायतींचा संपणार मुदतगोंदिया तालुका-चुटिया, फुलचूर, फुलचूरटोला, घिवारी, हिवरा, कटंगीटोला, खमारी, नागरा, बलमटोला, भानपूर, देपेवाडा, गंगाझरी, खर्रा, लोधीटोला (चु), लोधीटोला (धा.), सोनबिहारी, बघोली, चंगेरा, गर्रा बु., गिरोला, जिरुटोला, कोचेवाही, कोरनी, मोगर्रा, नवेगाव (पा), परसवाडा, रावणवाडी, सावरी, बनाथर, बिरसोला, छिपिया, डोंगरगाव, एकोडी, कासा, काटी, पोवारीटोला, सेजगाव.तिरोडा तालुका-बेरडीपार (का.), बेरडीपार (खु.), बोपेसार, धादरी (उमरी), पालडोंगरी, पिंडकेपार, सेलोटपार, बोदलकसा, डब्बेटोला, खोपडा, लोणारा, नवरगाव, सतोना, सोनेगाव, आलेझरी (बालापूर), घोगरा, गोंडमोहाडी (कि.), नवरटोला, सर्रा.गोरेगाव तालुका-बोरगाव, चिल्हाटी, घोठी, हिरापूर, कालीमाटी, कवलेवाडा, खडीपार, म्हसगाव, मोहगाव (बु.), पाथरी, सहारवानी, तिल्ली, तुमसर, असलपाणी, चिचगाव, चोपा, गिधाडी, गोंडेखारी, हिराटोला, मालपुरी, मेंघाटोला, निंबा, सोनेगाव, सोनी, तेढा, तेलनखेडीअर्जुनी-मोरगाव तालुका-बाराभाटी, भरनोली, बोंडगाव-देवी, दिनकरनगर, ईसापूर, कन्हाळगाव, कवठा, कोरंभीटोला, कुंभीटोला, महागाव, माहुरकुडा, मांडोखाल, सावरटोला, सिलेझरी, तिडका-कराड, बोंडगाव (सूर), बोरी, देवलगाव, ईडला, जानवा, करांडली, केशोरी, परसटोला, बरसोडी-राई, पवनी-धाबे, प्रतापगड, येगाव, झाशीनगर, बोरटोला.देवरी तालुका-चिल्हाटी, चिपोटा, ईस्तारी, कडीकसा, ककोडी, मेहताखेडा, मिसपिरी, मुरमाडी, परसोडी, उचेपूर, गोटाबोडी, कन्हाळगाव, कोटजंभोरा, पालांदूर, पिंडकेपार, पिंडकेपार (चि), सर्रेगाव, शेरपार, शिलापूर, भर्रेगाव, बोरगाव (ब.), देवाटोला, भुटाना, बडेगाव, लोहारा, मुरदोली, सावली, शिरपूर-बांध, सुरटोली.आमगाव तालुका-आमगाव, अंजोरा, आसोली, बंजारटोला, बसीपार, चिरचाळबांध, धवडीटोला, घाटटेमणी, गोसाईटोला, जामखारी, कालीमाटी, कट्टीपार, किकरीपार, कुंभारटोली, महारीटोला, मरारटोला, मुंडीपार, रामाटोला, सरकारटोला, सिवनी, सोनेखारी, ठाणा, वालद, येरमडा.सालेकसा तालुका-कारूटोला, कावराबांध, कोटजंभुरा, कोटरा, मनगड, मुंडेपार, पाऊलदौणा, पोवारीटोला, सालेकसा, सातगाव.सडक-अर्जुनी-चिखली, पळसगाव (रा), कोसबी, राका, रेंगेपार (प.), घाटबोरी-तेली, कोकणा-जमी, कोसमतोंडी, बौद्धनगर, खोबा, मुरपार-लेंडी, पांढरी, संधीपार, दल्ली, घाटबोरी-कोहळी, कोदामेडी, कोयलारी, घाटेगाव, जांभळी (डो.).
१९३ ग्रामपंचायतींना निवडणुकीचे वेध
By admin | Updated: January 22, 2015 01:34 IST