शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
2
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
3
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
4
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
5
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
7
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
8
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
9
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
10
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
11
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
12
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
13
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
14
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
15
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
16
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
17
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
18
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
19
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
Daily Top 2Weekly Top 5

मलेरियाने आठ जणांचा मृत्यू

By admin | Updated: August 13, 2014 23:56 IST

जिल्ह्यात डेंग्यू व मलेरियाची दहशत पाय पसरत आहे. डेंग्यूचा ६ तर मलेरियाचा १० गावांत उद्रेक आहे. गेल्या दोन महिन्यांत मलेरियाचे आठ रूग्ण दगावले. डेंग्यूचा एकही बळी गेला नाही.

१० गावांत उद्रेक : जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णाचा मृत्यू नाहीनरेश रहिले - गोंदियाजिल्ह्यात डेंग्यू व मलेरियाची दहशत पाय पसरत आहे. डेंग्यूचा ६ तर मलेरियाचा १० गावांत उद्रेक आहे. गेल्या दोन महिन्यांत मलेरियाचे आठ रूग्ण दगावले. डेंग्यूचा एकही बळी गेला नाही.गोंदिया जिल्ह्यातील पिपरटोला, जमुनिया, हिरडामाली, रेहडी, श्रीधरटोला, डुंबरटोला, सिंधीटोला, गोवारीटोला, मुरपार व म्हैसुली या गावात मलेरियाने थैमान घातले. यामुळे आरोग्य विभागाने २ लाख १६ हजार ८०८ रूग्णांची रक्त तपासणी केली. त्यात मलेरियाने १२६ रूग्ण (पीव्ही)पॉझिटीव्ह तर २४६ (पीएफ)पॉझिटीव्ह असे ३७२ रूग्ण मलेरियाने पॉझिटीव्ह आढळले. पीएफ पॉझिटीव्ह रूग्णांमधील ३० टक्के रूग्ण दगावतात असे शासनाचा अंदाज आहे. परंतु २४६ रूग्णांपैकी आठ जणांचा मृत्यू गोंदिया जिल्ह्यात मलेरियाने झाला आहे. शासनाच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या मृत्यूची टक्केवारी घेतली तर एवढ्या रूग्णांत ७४ रूग्णांचा मृत्यू झाला असता. मलेरियाच्या ६६ रूग्णांचे प्राण वाचविण्यात आरोग्य विभागाला यश आले. मुरपार व म्हैसुली या दोन गावात मलेरियाचे सर्वाधिक रूग्ण होते. मात्र या गावातील एकाही व्यक्तूचा मृत्यू झाला नाही. पिपरटोला, जमुनिया, हिरडामाली, रेहडी, श्रीधरटोला, डुंबरटोला, सिंधीटोला व गोवारीटोला या गावातील प्रत्येक एक अश्या आठ व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती हिवताप कार्यालयाने दिली.डेंग्यूच्या रूग्णाचे लक्षण आढळलेल्या ३९ जणांचे रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. यातील १८ रूग्णांचे नमुने डेंग्यूने पॉझिटीव्ह आढळले. जिल्ह्यातील कोटरा, ताडगाव, सिरेगावबांध, राजोली, कोरंभी, वळद या सहा गावात डेंग्यूचा उद्रेक आहे. परंतु या गावातील एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. दवनीवाडा येथे डेंग्यूचा उद्रेक झाला अशी ओरड होती. या गावातील १५ जणांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्या रूग्णांना मलेरिया किंवा डेंग्यू आढळला नाही. या गावात एका व्यक्तीचा मृत्यू झाला तो मलेरिया किंवा डेंग्यूने नाही तर इतर आजाराने झाला, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.