शहरं
Join us  
Trending Stories
1
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
2
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
3
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
4
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
5
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
6
"पाच टप्प्यांतच भाजपा तीनशेपार, तर काँग्रेस…’’,  अमित शाहांचा मोठा दावा 
7
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
8
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
9
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
10
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
11
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."
12
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
13
"4 जून रोजी भरपूर पाणी जवळ ठेवा...", प्रशांत किशोर यांचा टीकाकारांवर निशाणा
14
PHOTOS : लोकसभा निवडणुकीत कलाकारांची एन्ट्री; म्हणाले, 'अब की पार 400 पार' निश्चित
15
IPL क्वालिफायर २ अन् फायनल लढतीत पावसाचा बाधा; सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार ट्रॉफी?
16
T20 WC मध्ये टीम इंडियाला घाबरू नका, त्यांना १० वर्षात...; इंग्लंडच्या माजी खेळाडूने उगाच डिवचले
17
"कुणी कितीही बोललं तरी बटण..."; भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा शरद पवार गटाचा आरोप
18
जानकरांकडून महायुतीला ४२ जागांचा अंदाज, पण आठवलेंचा रिव्हर्स गियर; म्हणाले...
19
Swami Samartha: रोजच्या पूजेत 'या' गोष्टींचा समावेश केला तर स्वामी समर्थांची निश्चितच होईल कृपा!
20
"माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नको..." प्रज्वल रेवन्नाला आजोबा देवेगौडांचा इशारा

आठ तोतया शिक्षकांनी उचलले २५ लाखांचे कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 12:31 AM

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बजाज फिनसव्हर्स कंपनीच्या एका कर्मचाऱ्यांच्या मदतीने कर्जाची उचल करण्यासाठी आठ जणांनी स्वत:ला शिक्षक असल्याचे दाखवून त्यासाठी खोटे पगार पत्रक तयार केले. या खोट्या पगार पत्रकाच्या आधारे २५ लाख २९ हजारांची उचल करणाऱ्या त्या तोतया आठ शिक्षकांसह बजाज कंपनीच्या कर्मचाऱ्यांसह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गोंदिया येथील ...

ठळक मुद्देकंपनीच्या कर्मचाऱ्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल : जिल्ह्यात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बजाज फिनसव्हर्स कंपनीच्या एका कर्मचाऱ्यांच्या मदतीने कर्जाची उचल करण्यासाठी आठ जणांनी स्वत:ला शिक्षक असल्याचे दाखवून त्यासाठी खोटे पगार पत्रक तयार केले. या खोट्या पगार पत्रकाच्या आधारे २५ लाख २९ हजारांची उचल करणाऱ्या त्या तोतया आठ शिक्षकांसह बजाज कंपनीच्या कर्मचाऱ्यांसह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गोंदिया येथील चांदणी चौकातील सारासार कॉम्प्लेक्स पोद्दार स्टीलजवळ दुसºया माळ्यावर बजाज फिनसव्हर्स कंपनीचे आॅफिस आहे. येथे उमेश जांभूळकर नावाच्या व्यक्तीने आठ लोकांना कर्ज मिळवून देण्यासाठी त्यांना तोतया शिक्षक बनविले. यासाठी त्याने खोटे पगार पत्रक, ओळखपत्र व कागदपत्रे तयार केली. सप्टेंबर ते डिसेंबर २०१७ या दरम्यान हा प्रकार घडला.गोंदियातील ललीत बलीराम अगाडे, राजेश सेवकराम राऊत, मनोज पोलीराम डोंगरे, लोकेश प्रभाकर ढोमणे, बबीता प्यारेलाल सोनवाने, भरतलाल चैनलाल पारधी, प्रशांतकुमार बिसेन कोचे, शिवलाल सूजरलाल मंडीये या आठ लोकांना आरोपी उमेश जांभूळकर यांनी शिक्षक असल्याचे दाखविले. त्यांचे खोटे पगार पत्रक तयार करुन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे खोटे स्टेटमेंट व शाळेचे खोटे ओळखपत्र दाखवून बजाज फिनसव्हर्स कंपनीकडून २५ लाख २९ हजार रुपये रकमेच्या कर्जाची उचल केली. दरम्यान उचल केलेल्या कर्जाच्या रक्कमेचा आकडा अधिक असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासंदर्भात राकेश विठ्ठलराव बनकर (३२) यांच्या तक्रारीवरुन गोंदिया शहर पोलिसांनी सदर आरोपीविरुध्द भादंविच्या कलम ४०६, ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.मोठे घबाड उघडकीस येण्याची शक्यतातोतया शिक्षकांच्या नावावर बजाज फिनसव्हर्स कंपनीतून कर्जाची उचल करण्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. शिवाय उचल केलेल्या कर्जाचा आकडा २५ लाख रुपयांपेक्षा अधिक असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे यातील मोठे घबाड उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.हप्ते थकल्याने फुटले बिंगज्या तोतया शिक्षकांनी बजाज फिनसव्हर्स कंपनीतून कर्जाची उचल केली. मात्र त्यानंतर त्यांनी उचल केलेल्या कर्जाचे हप्ते नियमित भरले नाही. कर्जाची उचल केल्यापासूनच हप्ते थकल्याने कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी रिकव्हरीसाठी सदर तोतया शिक्षकांनी दिलेल्या पत्तावर जाऊन चौकशी केली तेव्हा या नावाचे कुणीही शिक्षक नसल्याची बाब उघडकीस आली. त्यानंतर या प्रकरणाचे बिंग फुटले.

टॅग्स :Teacherशिक्षक