शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
2
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
3
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
4
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
5
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
6
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
7
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
8
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
9
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
10
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
11
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
12
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?
13
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
14
इकडून सोने टाका अन् तिकडून पैसे काढा.. सोने खरेदी-विक्रीसाठी बाजारात आलंय ATM
15
शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला! लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेत्री झाली आई, थाटामाटात केलं बारसं
16
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
17
दुर्दैवी! टॅम्पोचा अपघात; मदत करण्याऐवजी तेल लुटण्यासाठी उडाली झुंबड, क्लिनरचा जागीच मृत्यू
18
महापालिका निवडणुकीस BJP सज्ज, कार्यकर्त्यांना नवे बळ; संघटनबांधणी मजबूत, पक्षशक्ती भक्कम
19
खेळण्यावरून वाद, अवघ्या १३ वर्षांच्या मुलानं धाकट्या बहिणीचा चिरला गळा
20
मुकेश अंबानींची रोजची कमाई किती? आकडा वाचून बसेल धक्का; दर तासाला कुठून येतात कोट्यवधी रुपये

'ड्यूटीपर ॲप' केवळ नावालाच; सहीवरूनच काढले जाते वेतन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 18:04 IST

कार्यालयात उशिरा येणे झाली नित्याचीच बाब : शिस्त लागणार कधी?

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कर्मचाऱ्यांनी कार्यालयात येण्याचे बंधन पाळावे, यासाठी जिल्ह्यातील आरोग्य विभाग व इतर कार्यालयांमध्ये 'ड्यूटीपर अॅप' कर्मचाऱ्यांना दिला आहे. मात्र, प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांचे वेतन रजिस्टरवर केलेल्या सहीवरूनच निघत असते. त्यामुळे बरेच कर्मचारी उशिरा येतात.

पाच दिवसांचा आठवडा केल्यापासून शासकीय कर्मचाऱ्यांची कार्यालयात येण्याची वेळ सकाळी ९:४५ वाजताची केली आहे. मात्र, ही वेळ बरेच कर्मचारी पाळत नसल्याच्या तक्रारी आहेत. ५० टक्के कर्मचारी १० वाजेनंतरच पोहोचतात. कर्मचाऱ्यांना वेळेवर येण्याची शिस्त लागावी म्हणून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांसाठी 'ड्यूटी पर अॅप' दिला आहे. कार्यालय परिसरात गेल्यानंतर लोकेशन स्वीकारते. त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याच्या उपस्थितीची नोंद होते. असे असले तरी कर्मचाऱ्यांचे वेतन मात्र या अॅपनुसार निघत नाही. वर्ष उलटले तरी ट्रायलच सुरू असल्याचे दिसून येते.

वेळेवर येणारे कमीचकर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्याची वेळ सकाळी ९:४५ वाजताची ठरवून देण्यात आली आहे. मात्र, बरेच कर्मचारी यावेळेत येत नाहीत. मग पाच दिवसांच्या आठवड्याचे महत्त्व काय? असा प्रश्न उपस्थित होतो.

बायोमेट्रिक बिघडतात कशाकाही शासकीय कार्यालयातील बायोमेट्रिक मशीन बिघडल्याचे आढळून आले. मात्र, या मशीन बिघडतात कशा, असा प्रश्न आहे. खासगी कंपन्यांमधील बायोमेट्रिक कित्येक वर्षे बिघडत नाही. मग शासकीय कार्यालयातीलच मशीन बिघडतात कशा, असा प्रश्न आहे. 

वरिष्ठांचा धाक संपलाअनेक कार्यालयांमध्ये वरिष्ठांचा धाक संपला आहे. अधिकारी किंवा त्या कार्यालयाचे मुख्य हेच वेळेवर येत नाहीत, तर कर्मचारी कसे येणार ? शासकीय कार्यालयात १० वाजेनंतरच कर्मचाऱ्यांची उपस्थिती दिसून येते, हे चिंताजनक आहे.

उशिरा का थांबायचे?शासनाच्या नियमानुसार जर सकाळी ९:४५ वाजता कार्यालयात पोहोचले तर सायंकाळी ६:१५ वाजता सुटी व्हायला पाहिजे. एखादे काम असल्यास उशिरा कार्यालयात का थांबावे, असा प्रश्न कर्मचारी करीत आहेत.

कारवाई नाहीशासकीय कार्यालयात उशीरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जात नाही. गोंदियात अशी कारवाई नाहीच.

टॅग्स :gondiya-acगोंदिया