शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

झटक्यांनी वाहनचालकांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 22:18 IST

शहरातील सर्वच रस्ते उखडले असून त्यांच्या दुर्देशेमुळे शहरवासीयांना त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील प्रत्येकच भागात ही स्थिती असून एकही भाग रस्त्यांच्या या समस्येपासून सुटलेला नाही.

ठळक मुद्देशहरातील रस्ते उखडले : शहरवासीयांत रोष, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील सर्वच रस्ते उखडले असून त्यांच्या दुर्देशेमुळे शहरवासीयांना त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील प्रत्येकच भागात ही स्थिती असून एकही भाग रस्त्यांच्या या समस्येपासून सुटलेला नाही.परिणामी शहवासीयांवर चांगले रस्ते शोधण्याची वेळ आली आहे. रस्त्यांवरील खड्यांमुळे झटक्यांनी ‘हड्डी-पसली’ एक होत असल्याची ओरड शहवासीयांकडून होत आहे.विदर्भाची मुंबई अशी गोंदियाची ख्याती आहे. व्यापार, उद्योग, वनसंपदा वा राजकारण या सर्वांचे वरदान गोंदियाला लाभले आहे. मात्र ‘नाम बडे और दर्शन छोटे’ अशी वास्तवीक स्थिती गोंदिया शहराची झाली आहे. अन्य सोयी-सुविधांचे न बोललेलेच बरे, मात्र रस्त्यांच्या बाबतीत एखाद्या गावापेक्षाही गचाळ स्थिती शहरातील रस्त्यांची झाली आहे. सध्या स्थितीत शहरातील एकाही भागात चांगला रस्ता दिसून येत नाही. चांगल्या रस्त्यांचे जाळे पसरविण्याची गरज आहे. शहरातील रस्त्यांची एवढी दुर्दशा झाली आहे की, शहरवासीयांना पाय ठेवणे कठीण झाले आहे. वाहनांनी तर सोडाच पायी चालणाºया देखील चांगलीच कसरत करावी लागत आहे. कोण कधी कोणत्या खड्डयात जावून पडेल याचा नेम राहिलेला नाही.शहरावर दिग्गज राजकारण्यांची सावली आहे. असे असतानाही शहरातील रस्त्यांची स्थिती बघता असे जाणवत नाही.जिल्ह्याला नक्षलग्रस्त असल्याचा शाप आहे. मात्र नक्षलग्रस्त भागातील रस्ते चांगले गुळगुळीत असून त्या भागाचा शाप फक्त गोंदिया शहराच्या वाट्याला आल्याचे भासते. शहरातील सिव्हील लाईन्स परिसराची तर व्याख्याच येथील रस्त्यांनी बदलून टाकली आहे.येथून ये-जा करणे म्हणजे भीतीदायक झाले आहे. बाजारातही तोच प्रकार असून एकही परिसर रस्त्यांच्या यापासून सुटलेला नाही. म्हणूनच रस्त्यांवर निघाल्यास लागत असलेल्या झटक्यांनी ‘हड्डी-पसली’ एक झाल्याचे शहरवासी बोलत आहेत.आपचे खड्डे बुजाओ अभियानशहरातील रस्त्यांची दुर्दशा आणि त्यावरील खड्डयांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पक्षाने खड्डे बुजाओ उपक्रम बुधवारपासून सुरू केले.जयस्तंभ चौक परिसरातील खड्डे बुजवून या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. किमान आतातरी प्रशासने याची दखल घ्यावी हाच या उपक्रमाचे उद्देश आहे.सिमेंट रस्त्यांवर डांबराचा लेपशहरात सध्या एक आगळावेगळा प्रयोग केला जात असल्याचे बघावयास मिळत आहे. त्याचे असे की, शहरातील सिमेंट रस्त्यांवर डांबराचा लेप चढविला जात आहे. आता हा लेप जास्त दिवस टिकणार नाही याबाबत कंत्राटदार व इंजिनीयरच नव्हे सर्वसामान्य माणसाला माहिती आहे. नेमका तोच प्रकार शहरात घडत असून डांबराचे कोट उखडून त्यावर खड्डे पडत आहेत. एकंदर स्थिती अधिकच खराब होत असून शिवाय त्यावर पैशांची उधळपट्टी केली जात आहे.