शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पितृ पंधरवड्यात नैवेद्य शिवण्यासाठी कावळे दिसेनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 15:46 IST

टाकलेला घास तसाच पडून : काक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर?

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : पितृ पंधरवडा म्हटले की या पंधरा दिवसांत पितरांना जेवू घालण्याची लगबग असते. पितरांसाठी केलेल्या नैवेद्याला काकस्पर्श होणे या दिवसांत महत्त्वाचे मानले जाते. मात्र, शहरात अनेकदा नैवेद्याला कावळा शिवत नसल्याने काकस्पर्शासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागते. काक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर असून, जेवणावळींनाही घरघर लागली आहे. पितृ पंधरवड्यात काकस्पर्शाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याशिवाय पितर म्हणून जेवू घालणाऱ्या व्यक्तीलाही तितकेच महत्त्व आहे. पूर्वी पितर म्हटले की भल्या पहाटेपासून पितराचा स्वयंपाक बनविण्यासाठी घरातील स्त्रियांची लगबग असे. घरोघरी दिवसभर जेवणावळी सुरू असत. परंतु, विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आता हे चित्र बदलले आहे. 

वातावरणातील बदलांचा फटका सध्या वातावरणातील बदलांमुळे कावळ्यांच्या प्रजाती नष्ट होत आहेत. वृक्षतोड, नष्ट होणारे नैसर्गिक पाणवठे, पर्यावरणातील मानवी हस्तक्षेप, पर्या- वरणातील बदल अशा अनेक गोष्टी त्यासाठी कारणीभूत आहेत. पक्षिमित्र, पक्षिनिरीक्षक बऱ्याचदा याबाबत चिंता व्यक्त करीत आहेत. अन्य पक्ष्यांसह कावळ्यांचीही संख्या काही भागांत घटलेली पाहायला मिळते.

जीवनसाखळीत बाधा येण्याचा धोकामनुष्य निसर्गात फेकत असलेले रेडिमेड खाद्य पक्ष्यांना मिळू लागल्याने नैसर्गिक अधिवास धोक्यात येऊन प्रजाती नष्ट होत आहेत. जीवनसाखळी तुटण्याचा धोका निर्माण झाल्याचे चित्र आहे. पर्यावरणासाठी ही चिंतेची बाब असल्याचे पर्यावरणप्रेमी रूपेश निबार्ते यांनी सांगितले.  

टॅग्स :gondiya-acगोंदिया