शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

प्रेम प्रकरणातून एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्यावर ताणला देशीकट्टा, घटनेमुळे खळबळ

By अंकुश गुंडावार | Updated: September 2, 2022 15:53 IST

दासगाव येथील घटना : देशीकट्टा आला कुठून? गावकऱ्यांमध्ये खळबळ

रावणवाडी (गोंदिया) : प्रेम प्रकरणातून एका विद्यार्थ्यांने दुसऱ्या विद्यार्थ्यावर देशीकट्टा ताणल्याची घटना शुक्रवारी (दि.२) सकाळच्या सुमारास गोंदिया तालुक्यातील दासगाव येथील राणी अवंतीबाई चौक येथे घडली. दरम्यान घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली असून त्या विद्यार्थ्यांकडे देशीकट्टा आला कुठून याचीच चर्चा आहे.

प्राप्त माहितीनुसार दासगाव येथे शाळा महाविद्यालय असून अकाराव्या वर्गात शिकत असलेल्या दोन विद्यार्थ्यांमध्ये शुक्रवारी सकाळी ८ वाजता सुमारास राणी अवंतीबाई चौकात वाद झाला. हा वाद नेमका कशावरुन झाला हे समजण्यास उपस्थित विद्यार्थी व नागरिकांना मार्ग नव्हता. दरम्यान सोनबिरी येथील एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्यावर देशी कट्टा ताणला. दरम्यान याप्रकाराने उपस्थित विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये थोड्यावेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान याप्रकरणाची अद्यापही रावणवाडी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. दोन्ही विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपसी तडजोड करुन वाद मिटविल्याची माहिती आहे. तसेच झालेल्या वादात देशी कट्टा काढल्याचे वृत्तदेखील खाेटे असल्याचे सांगितले. तर, दोन विद्यार्थ्यांमध्ये वाद हा प्रेमप्रकरणातून झाल्याचे बोलल्या जाते.

यासंदर्भात दासगाव बीटचे अमंलदार पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी शुक्रवारी सकाळी दोन विद्यार्थ्यांमध्ये वाद झाल्याच्या घटनेला दुजोरा दिला. मात्र, यापैकी एका विद्यार्थ्याजवळ देशी कट्टा होता की नाही हे माहिती नसल्याचे सांगितले. दरम्यान दोन्ही विद्यार्थ्यांना तक्रार करण्यासासाठी रावणवाडी पोलीस स्टेशन येथे येण्यास सांगितले असल्याची माहिती दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीStudentविद्यार्थी