शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
3
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
4
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
5
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
6
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
7
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
8
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
9
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
10
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
11
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
12
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
13
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
14
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
15
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
16
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
17
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
18
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
19
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
20
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...

ओव्हरलोड वाहनांमुळे रस्त्यांची लागली वाट

By admin | Updated: June 4, 2014 23:52 IST

शहरांना जोडण्याकरिता उभारण्यात आलेल्या महामार्गावर सर्वाधिक ओव्हरलोड वाहनांनीच वाहतूक होत असून या ओव्हरलोड ट्रक व कंटेनरच्या वाहतुकीला अद्याप कोणीही प्रतिबंध घातलेला नाही.

गोंदिया : शहरांना जोडण्याकरिता उभारण्यात आलेल्या महामार्गावर सर्वाधिक ओव्हरलोड वाहनांनीच वाहतूक होत असून या ओव्हरलोड ट्रक व कंटेनरच्या वाहतुकीला अद्याप कोणीही प्रतिबंध घातलेला नाही. परिणामी अपघातांच्या प्रमाणात वाढ तर होते. शिवाय रस्त्याचीही पुरती वाट लागत आहे.ट्रक, कंटनेर, ट्रॅक्टर ही मालवाहू वाहने आहेत. या वाहनांत किती टन माल वाहून न्यायचे याचे प्रमाण ठरलेले असते. चार चाकाच्या ट्रकचे खाली वजन चार हजार ७0 किलो आणि त्यात माल भरला तर ते वजन ११ हजार ९५0 किलोपेक्षा जास्त नसावे, दहा आणि बारा चाकांच्या रिकाम्या ट्रकचे वजन सहा हजार ७७२ किलो आणि माल भरुन २५ हजार  किलोपेक्षा जास्त नसावे, १६ चाकांपेक्षा जास्त चाकांच्या रिकाम्या ट्रेलरचे वजन १५ हजार आणि माल भरलेले असेल तर ३१ हजार २00 किलोपेक्षा जास्त नसावे असे प्रमाण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यलयाने ठरवून दिले आहेत.महामार्गावर जडवाहतूक करणार्‍या प्रत्येक वाहनांत प्रमाणापेक्षा जास्तच माल भरलेला असतो. अतिजड वाहने चालवितांना चालकांचे कधी नियंत्रण सुटणार याचा नेम नाही. शिवाय ही वाहने चालविणारे चालक आपली दिशा सोडत नसतात. समोरुन येणार्‍या वाहन चालकालाच आपले वाहन रस्त्याच्या बाजूला न्यावे लागते. परिणामी अपघात घडतात. रस्ते कितीही मजबूत तयार केले असले तरी ओव्हरलोड वाहनांमुळे रस्त्याची वाट लागणे निश्‍चितच असते. ओव्हरलोड वाहने रस्त्याच्या दुरावस्थेला कारणीभूत ठरत असली तरी रस्त्यावरील खड्डय़ांचा इतर वाहनांनाच अधिक त्रास होतो. त्यामुळे आपल्या मार्गाने गाडी चालवत असतानाही अनेकदा वाहन अपघात घडत असतात. ओव्हरलोड वाहनांची उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांनी तपासणी केल्यानंतर दोषी वाहनांवर दंडात्मक कारवाई केली तर ही ओव्हरलोड वाहतूक थांबू शकते. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने हा प्रकार बिनधास्त  सुरू आहे. (शहरप्रतिनिधी)