शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे शहरवासीयांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 23:59 IST

दिवसेदिवस गंभीर होत चाललेल्या पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ हा तोडगा दिसून येत आहे. यामुळे नगर परिषदेने शहरात ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ अनिवार्य केली आहे. असे असतानाही शहरात नवीन बांधकाम केले जात असताना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ केली जात नसल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देगोंदिया : बंधनकारक असूनही शहरवासीयांचा प्रतिसाद नाही, अनामत रक्कम घेऊन दिली जाते मंजुरी

कपिल केकतलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दिवसेदिवस गंभीर होत चाललेल्या पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ हा तोडगा दिसून येत आहे. यामुळे नगर परिषदेने शहरात ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ अनिवार्य केली आहे. असे असतानाही शहरात नवीन बांधकाम केले जात असताना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ केली जात नसल्याचे दिसून येत आहे. यातून ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’कडे शहरवासीयांनी पाठ केल्याचे दिसून येत आहे.पाण्याचा वापर होत असताना मात्र पाणी साठवून व जिरवून ठेवण्यासाठी काहीच प्रयत्न केले जात नसल्याचे दिसत आहे. परिणामी पाणी टंचाई रौद्र रूप धारण करीत आहे. आपल्या वाड-वडिलांची पुण्याई असल्यामुळे आज आपल्याला पाणी मिळत आहे. मात्र आज आपण पाणी वाचविले नाही तर येणारी पिढी मात्र पाण्यासाठी तडफडणार अशी स्थिती आता निर्माण होण्यास सुरूवात झाली आहे.त्यामुळे पाणी टंचाईचा गंभीर विषय लक्षात घेत नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी शहरात ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ करणे अनिवार्य केले आहे. शहरात आपल्या बांधकामादरम्यान ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ करणाऱ्यांना मालमत्ता कर मध्ये काही टक्के सुट देण्याचेही नगर परिषदेच्या विचाराधीन आहे.मालमत्ता करात सूट विचाराधीनपाणी टंचाई लक्षात नगर परिषदेने शहरात ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ अनिवार्य केली आहे. याकरिता शहरवासीयांना प्रोत्साहीत करण्यासाठी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ तसेच दोन झाड लावणाऱ्यांना मालमत्ता करात पाच टक्के सूट देणे नगर परिषदेच्या विचाराधीन आहे.-अशोक इंगळेनगराध्यक्ष, नगर परिषद, गोंदिया.अनामत रक्कम आहे जमानगर परिषदेच्या नगर रचना विभागाकडून नवीन बांधकामासाठी मंजुरी घ्यावी लागते. या मंजुरीसाठी नगर परिषद विकास शुल्क, ‘रेन वॉटर हार्वेस्ंिटग’ व वृक्ष लागवड शुल्क अनामत रक्कम स्वरूपात घेते व बांधकामाला मंजुरी दिली जाते. ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ करविल्यानंतर त्याची पाहणी संबंधिताला अनामत रक्कम परत केली जाते. यानुसार नगर परिषदेने मागील पाच वर्षांत एक हजार एक बांधकामांना मंजुरी देऊन त्यांच्याकडून अनामत रक्कम घेतली आहे. मात्र आश्चर्याची बाब अशी की, मागील वर्षांपासून नगर परिषदेकडे ही अनामत रक्कम पडून आहे. याचाच अर्थ मागील वर्षांत या बांधकामांत ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ची सोय करण्यात आलेली नाही. यातून शहरवासी आजही पाण्याची बचत करण्याप्रती जागरूक नसल्याचे दिसते.प्रभागनिहाय जनजागृती करणार‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ करणे आज अत्यंत गरजेचे झाले असून शहरवासीयांना आदर्श म्हणून नगर परिषद कार्यालयात हा प्रयोग केला जाणार आहे. याशिवाय शहवासीयांना जागरूक करण्यासाठी प्रभागनिहाय जनजागृती कार्यक्रम घेणार आहोत. मालमत्ता करात सुट देण्याचा विषयही विचाराधीन आहे.- चंदन पाटील,मुख्याधिकारी, नगर परिषद, गोंदियाजल पुनर्भरणाचे हे आहेत फायदेपाणीपुरवठ्यासाठी बाहेरील स्रोतांवर कमी प्रमाणात अवलंबून राहावे लागते. जलसंधारणामुळे जमिनीखालील पाण्याची पातळी वाढते.जमिनीखालील पाण्याची पातळी वाढल्यामुळे, पाणी वर खेचण्यासाठी लागणाºया विजेच्या वापरात बचत होते. जमिनीखालील पाण्याच्या प्रदूषणाचे सौम्यीकरण झाल्यामुळे, पाण्याचा दर्जादेखील सुधारतो. जमिनीची धूप रोखण्यास काही प्रमाणात मदत होते.गच्चीवरील पाण्याच्या संधारणाच्या पद्धती तुलनेने अवलंबण्यास सोप्या आहेत. बºयाच पद्धती या घर बांधण्यासाठी, वापरण्यासाठी आणि निगा राखण्यासाठी गरजेच्या आहेत.निसर्गात स्वच्छ आणि गोड्या पाण्याची कमतरता असल्यामुळे अधिक गोड्या पाण्याचा पुरवठा करणाºया पावसाच्या पाण्याचे नियोजन आवश्यक आहे.जल पुनर्भरण केल्याने जमिनीतील पाण्याची पातळी वाढते. यामुळे भविष्यातील पाणी टंचाईची समस्या सोडविता येणार आहे. कारण सर्वात जास्त पाणी जमिनीतूनच ओढले जात आहे.

टॅग्स :RainपाऊसWaterपाणी