लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : सरल प्रणालीअंतर्गत इयत्ता पहिली ते बारावीच्या मुलांची स्टुडंट पोर्टलवर आधार नोंदणी केली जाते. यंदा पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची सरल प्रणालीअंतर्गत स्टुडंट पोर्टलमध्ये आधार क्रमांकानुसार नोंदणी झाल्यानंतर पडताळणीत राज्यभरात जवळपास २४ लाख विद्यार्थी बोगस आढळले आहेत. यात गोंदिया जिल्ह्यातील आठ हजार २७८ विद्यार्थ्यांचे आधार कार्ड डबल दाखवत असल्याने हे विद्यार्थी बोगस आहेत काय, याचा शोध घेण्याचे पत्र गोंदिया जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. हे जर बोगस विद्यार्थी म्हणून समोर आले तर शिक्षकांना अतिरिक्त व्हावे लागणार आहे. जिल्ह्यात इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत गोंदिया जिल्ह्यात तीन लाख ९६ हजार ३५३ विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड सरल प्रणालीमध्ये अद्ययावत करताना आठ हजार २७८ विद्यार्थ्यांची दुबार नोंदणी सरल प्रणालीवर झाली असल्याने हे विद्यार्थी बोगस तर नाहीत ना, असा सवाल केला जात आहे.
जिल्ह्यात तीन लाख ९६ हजार ३५३ विद्यार्थ्यांची नोंदणी- अनेक विद्यार्थ्यांचे आधार कार्ड दोनदा नोंदणी झाल्याने ते विद्यार्थी किती आहेत याची निश्चित नोंद शिक्षण विभागाच्या पुढे आली नाही. - एकदा विद्यार्थिसंख्येचा आकडा पुढे आल्यावर तुकडी चालविण्याची संख्या तयार होते किंवा नाही ते तपासल्यानंतरच शिक्षक अतिरिक्त होणार किंवा नाही हे पुढे येईल. जिल्ह्यात तीन लाख ९६ हजार ३५३ विद्यार्थ्यांची नोंदणी आहे.
अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांचे समायोजनविद्यार्थी बोगस आढळल्यास शिक्षक अतिरिक्त होतील. परिणामी त्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येईल. शासनाच्या आदेशानुसारच शिक्षण विभाग काम करेल.
सर्वात जास्त डुप्लिकेट गोंदिया शहरात- सर्वात जास्त बोगस विद्यार्थी गोंदिया तालुक्यात असून, त्याची आकडेवारी एक हजार ८८५ आहे. जिल्ह्यात सर्वाधिक संख्या गोंदियात आहे.
एक हजार बोगस नावे डिलीट- सरल प्रणालीअंतर्गत इयत्ता पहिली ते बारावीच्या मुलांची स्टुडंट पोर्टलवर आधार नोंदणी केली जाते. यंदा पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची सरल प्रणालीअंतर्गत स्टुडंट पोर्टलमध्ये आधार क्रमांकानुसार नोंदणी करण्यात आली.- गोंदिया जिल्ह्यातील आठ हजार २७८ विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट नव्हते. यापैकी एक हजार बोगस नावे डिलीट करण्यात आली आहेत.
३० सप्टेंबरच्या उपस्थितीनुसार पटसंख्या निश्चित होईल. दुबार आधार कार्ड कुठे कुठे देण्यात आले त्याची तपासणी सुरू आहे. मागच्या आठवड्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. अजूनपर्यंत अहवाल आला नाही. अहवाल आल्यावर तो शिक्षण विभागाला पाठविण्यात येईल. - कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जि.प. गोंदियाबंजारीटोला येथे दोन ठिकाणी घरफोडी