लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण वाढीचा वेग कायम असला तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. त्यामुळे जिल्हावासीयांसाठी निश्चितच ही दिलासादायक बाब आहे. मंगळवारी ९ कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने आतापर्यंत एकूण २०८ कोरोना बाधित कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्यांची डब्बल सेंच्युरी झाली आहे.मंगळवारी जिल्ह्यात (दि.२१) एक कोरोना बाधित रुग्ण आढळून आला.हा रुग्ण गोंदिया तालुक्यातील भानपूर येथील असून तो रत्नागिरी येथून परतल्याची माहिती आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या २३५ वर पोहचली आहे. यापैकी आतापर्यंत २०८ कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून आपल्या घरी परले आहेत. तर जिल्ह्यात सध्या स्थितीत २१ कोरोना अॅक्टीव रुग्ण त्यांच्यावर येथील जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे.कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण ७३२१ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी गोंदिया येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. यापैकी २३५ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले असून ६९८३ स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. १३ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे. ८७ नमुन्यांचा अहवाल अद्याप अनिश्चित आहे.७०४ नमुन्यांची रॅपिड अँटीजेन टेस्टकोरोना विषाणूचा जिल्ह्यात संसर्ग वाढू नये, यासाठी कोरोना संशयित असलेल्या किंवा बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा रॅपिड अँटीजेन टेस्टच्या माध्यमातून शोध घेतला जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७०४ व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. यामध्ये ६९९ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
कोरोनामुक्तांची डब्बल सेंच्युरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 05:00 IST
कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण ७३२१ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी गोंदिया येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. यापैकी २३५ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले असून ६९८३ स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे.
कोरोनामुक्तांची डब्बल सेंच्युरी
ठळक मुद्देजिल्ह्यावासीयांना दिलासा : ६९८३ स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह