शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

तुमच्या हाता-पायाला मुंग्या तर येत नाहीत, दुर्लक्ष केल्यास बेतेल जीवावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 15:59 IST

नियमित व्यायाम गरजेचा : लकव्याची लक्षणे, तात्काळ उपचार घेणे आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची: जीबीएस (गुलियन बॅरी सिंड्रोम) हा दुर्मीळ आजार असून यात हात-पाय लुळे पडण्यासारखी लक्षणे दिसतात. याकडे थोडेसे दुर्लक्ष केले तरीही ते जिवावर बेतण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळीच निदान, योग्य उपचार व आरोग्यदायी जीवनशैलीतून या संकटावर मात करता येणे शक्य आहे.

वयाच्या दीड वर्षानंतर बाळातील चालण्यात किंवा हात-पाय हलवण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्यास म्हणजे वेळीच जीबीएसवर उपचार करणे अत्यंत गरजेचे आहे. साधारणतः हा आजार कुठल्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो. अंग दुखणे, चालताना तोल जाणे, चेहरा सुजणे, चावताना व गिळताना त्रास होणे, हात-पाय लुळे पडणे, अशी लक्षणे दिसून येतात, तर या आजाराचे प्रमाण लहान बाळामध्ये अधिक दिसून येत असून बुलियन बॅरी सिंड्रोम एक वेगाने प्रगतिशील पॉलिन्यूरोपॅथी आहे ज्यामुळे स्नायू कमकुवत होतात.

संशयास्पद रुग्णांसाठी इलेक्ट्रो मायोग्राफी आणि सीएसएफ विश्लेषण यासारख्या इलेक्ट्रोडायग्नोस्टिक उपचार करण्याचा सल्ला तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे या आजारा संदर्भातील लक्षणे आढळल्यानंतर तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेणे हितावह आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास या आजारातून सावरणे कठीण होते. यामुळे कायमचे अपंगत्व तसेच जीवालाही धोका होण्याची शक्यता असते.

ही आहेत या आजाराची लक्षणे?● हातापायाला मुंग्या येणे, स्नायू कमकुवत होणे आणि • डोळे किंवा चेहऱ्याची हालचाल करण्यास त्रास होणे यासारख्या लक्षणांबद्दल सतर्क राहणे गरजेचे आहे.● मज्जातंतू हळूहळू निकामी करून या आजाराचा विषाणू बोटं, पाय, हात, फुफ्फुस आणि श्वासनलिकेवरही हल्ला करत रुग्णाची अवस्था पक्षघात म्हणजे लकवा झाल्यासारखी होते.

काय आहे जीबीएस? वायरल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे तसेच लसीकरणानंतर काही जणांना जीबीएस हा आजार झाल्याचे आढळले आहे. हाता- पायाच्या नसा कमजोर होतात. रोगप्रतिकार क्षमता हळूहळू कमी होत जाते. पक्षघात म्हणजेच लकवा वात अशा प्रकारचे आजार जळू शकतात. साधारणतः हे आजार लसीकरणानंतर अधिक प्रमाणात आढळल्याचे दिसून आले आहे.

उपचाराने टळेल धोकाजीबीएस किंवा एआयडीपी या आजारावर आयव्हीआयजी हे इंजेक्शन देणे महत्त्वाचे आहे. हे इंजेक्शन महागडे असून तीन दिवसांच्या आत दिल्यास रुग्णांवरील धोका टळतो. मात्र, हे उपचार तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीमध्येच हिताचे ठरते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

हात-पाय लुळे पडण्याचीच लक्षणे नाही तर बाकी अवयवावर सुद्धा या आजाराचा प्रभाव पडू शकतो. कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला हे होऊ शकते; परंतु याचे प्रमाण वयाच्या दीड वर्षावरील बालकांमध्ये अधिक आढळून येते. त्यामुळे वेळीच योग्य तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन जीबीएसची चाचणी करून उपचार घेणे हितावह आहे.- डॉ. नरेंद्र खोबा, वैद्यकीय अधिकारी, कोरची

टॅग्स :gondiya-acगोंदिया