शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

शौचालय नसल्यास रेशन देऊ नका

By admin | Updated: August 28, 2016 00:56 IST

अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्याकडे शौचालय बांधणे बंधनकारक आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचा सल्ला: जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची सभागोंदिया : अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्याकडे शौचालय बांधणे बंधनकारक आहे. महिला बचतगटांना १०० टक्के शौचालय असल्याशिवाय स्वस्त धान्य दुकानातील धान्याचा पुरवठाच करु नका अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी जिल्हास्तरीय कार्यकारी समितीच्या सभेत दिल्या आहेत.स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या राष्ट्रीय कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरु आहे. स्वच्छता असेल तर समृध्दी नांदेल. कोणत्याही व्यक्तीने उघड्यावर शौचास बसू नये. प्रत्येकाने आपल्या घरी शौचालय बांधून रोगराई मुक्तीसाठी जिल्हा हागणदारी मुक्त करा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची सभा झाली. सभेला प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) राजकुमार पुराम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) राजेश बागडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) राजेश देशमुख, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे उपस्थित होते. पुढे डॉ.सूर्यवंशी म्हणाले, जिल्ह्यात पाणी मुबलक प्रमाणात आहे. त्यामुळे शौचालय बांधण्यास अडचण नाही. कोल्हापूर व पालघर येथे शौचालय बांधण्याची योजना राबविण्यात आली. त्याच धर्तीवर या जिल्ह्यात जास्तीत जास्त शौचालय बांधून जिल्हा हागणदारीमुक्त करावा. कोणताही अधिकारी शाळेत भेटीला गेला तर त्यांनी मुलांना प्रथम शौचालयाबाबत विचारावे. शाळेत हँडवॉश स्टेशन निर्माण करून विद्यार्थ्यांमध्ये हात धुण्याच्या सवयी लावाव्यात. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी वाहनाची नोंदणी करतांना त्यांच्याकडे शौचालय असल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक करावे. पोलीस विभागाने गुड मॉर्निंग पथकास सहकार्य करावे, सर्व ग्रामपंचायत सदस्यांकडे शौचालय बांधले आहे काय याची खात्री करून घ्यावी. शौचालय बांधकामाला वेग येण्यासाठी ग्रामसेवकांच्या स्पर्धा निर्माण कराव्यात. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रूग्णांना शौचालयाचे महत्व व त्यामुळे होणाऱ्या आजाराची माहिती द्यावी. जिल्ह्यातील माविमच्या महिला बचतगटातील ६० सहयोगीनींच्या स्पर्धा निर्माण करून ग्रामसभेच्या माध्यमातून शौचालय बांधकामाला वेग आणण्याचे काम करावे. महिला बचतगटांच्या ज्या सहयोगीनी शौचालय बांधण्याबाबत उत्कृष्ट काम करतील त्यांचा २६ जानेवारी रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येईल. गवंड्यांची गावनिहाय यादी तयार करावी. गोंदिया शहरातील मामा तलावाच्या शेजारी कोणीही शौचास बसू नये. जिल्ह्यात नविन तयार होणाऱ्या घरात वीज जोडणी देतांना शौचालयाची खात्री करून घ्यावी. ज्या घरात शौचालय नसेल त्या घरी नव्याने वीज जोडणी देवू नये, जिल्ह्यातील प्रत्येक गावात घरोघरी शौचालय बांधलेच पाहिजे असा आग्रह डॉ.सूर्यवंशी यांनी केला. सभेला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण, जि.प.वरिष्ठ लेखा अधिकारी जवंजाळ, महाराष्ट्र जिवनोन्नती अभियानाचे व्यवस्थापक अनिल गुजे, सहायक पोलीस निरीक्षक वाबळे, महिला व बालकल्याण विभागाचे अधिक्षक डी.एस.लोहबरे उपस्थित होते. उपमुख्य कार्यकारीअधिकारी राजेश देशमुख यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे आभार मानले.(तालुका प्रतिनिधी)