शहरं
Join us  
Trending Stories
1
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
2
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
3
दहशतवाद्यांचे 'ऑल आउट'?; काश्मीरच्या वाढत्या दहशतवादाविषयी केंद्र सरकारची आज महत्त्वपूर्ण बैठक
4
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
5
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
6
आम्ही देखील माणसं आहोत, चूक होऊ शकते; पाकिस्तानी खेळाडूची प्रामाणिक कबुली
7
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
8
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
9
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
10
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
11
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
12
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
13
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?
14
विमानाचं उडणं, उतरणं... एका श्वासाचं अंतर!
15
५९ देश, ६१ भाषांतील ३१४ चित्रपटांची मेजवानी
16
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
17
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
18
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
19
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
20
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान

सरकारच्या फसव्या घोषणांवर विश्वास ठेवू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 10:49 PM

राज्य सरकारने आदिवासींच्या विकासात अडसर निर्माण करुन डी.बी.टी. सारख्या योजना लादून आदिवासी तरुण-तरुणींना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम करीत आहेत. त्यांना वाम मार्गाकडे वळणारे हे फसवे धोरण आहे.

ठळक मुद्देसहषराम कोरोटे : भजेपार येथे भगवान बिरसामुंडा पुतळ््याचे अनावरण

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : राज्य सरकारने आदिवासींच्या विकासात अडसर निर्माण करुन डी.बी.टी. सारख्या योजना लादून आदिवासी तरुण-तरुणींना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम करीत आहेत. त्यांना वाम मार्गाकडे वळणारे हे फसवे धोरण आहे. वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तोंडचा घास हिसकावून घेणारी सरकारची ही कार्यप्रणाली आदिवासींच्या जिवनाशी खेळण्याचे काम करीत आहे. सर्वसामान्य जनतेने सरकारच्या फसव्या घोषणांवर विश्वास ठेवू नये असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी सहषराम कोरोटे यांनी केले.तालुक्यातील ग्राम भजेपार येथील क्रांतीसूर्य भगवान बिरसामुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शुक्रवारी (दि.२५) ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ग्राम चोपा येथील रविंद्र विद्यालयाचे प्राचार्य एस.बी. राऊत होते. दिप प्रज्वलन जि.प. सदस्य सुनित मडावी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी झेड.जे. भोयर, भिवराम विद्यालयाचे प्राचार्य अशोक पटले, आदर्श शिक्षक जी.एन. बिसेन, आर.के. किरसान, व्ही.आर. खोब्रागडे, यू.एल. टेंभरे, आर.सी. कटरे, मूर्तिकार राधेशाम नागपुरे, आदिवासी नॅशनल पिपल्स फेडरेशन समितीचे अध्यक्ष वसंत मडावी, माजी उपसभापती धानसिंग बघेले, डॉ. तारेंद्र बिसेन उपस्थित होते.पुढे बोलताना कोरोटे यांनी, आदिवासी समाजाने अंधश्रद्धा कमी करुन शिक्षणाकडे वळले पाहिजे, जेणे करुन समाजाचा विकास होईल. शिक्षण घेवून फक्त नोकरी करणे म्हणजे समाजाचा विकास नव्हे. एक नोकरदार फक्त बायका पोरांना शिक्षण देवू शकतो. पण एक उद्योजक अनेक लोकांना रोजगार देवून खºया दृष्टीने समाज विकास साधू शकतो. म्हणून सदर जबाबदारी स्वत:वर घ्या आणि उद्योगाकडे वळा असा सल्ला नवतरुणांना दिला. प्राचार्य पटले यांनी, समाजातील सांस्कृतिक वारसा कशाप्रकारे जतन करुन ठेवावा याबद्दल मार्गदर्शन केले. तर मूर्तिकार राधेशाम नागपुरे व इतर वक्तयांनी सुद्धा मार्गदर्शन केले.कार्यक्रमानिमित्त सकाळी सद्भावना रॅली काढण्यात आली व त्यानंतर रात्री समाज प्रबोधनकार तुषार सूर्यवंशी महाराज यांच्या किर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला. संचालन रामकुमार कोसने यांनी केले. आभार किसन मडावी यांनी मानले. कार्यक्रमासाठी भाकचंद मानकर, अरुण देवगडे, लक्ष्मण घरत, धनराज किरसान, प्रभूपाल गधवार, शालीकराम कुंभरे, ललीता पंधरे, भाकचंद कोडवते, देवचंद टेकाम, आनंदराव कोळवते, दिलीप कोळवते, प्रेमलाल धुर्वे, उषा टेकाम, धुरपता किरसान यांच्यासह भजेपार परिसरातील सर्व आदिवासीबांधवांनी सहकार्य केले.