शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
2
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
3
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
4
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
5
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
6
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
7
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
8
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
9
'पाश्चिमात्य दबावातही भारत-रशिया संबंध मजबूत', अमेरिकेचा उल्लेख करत रशियाची मोठी प्रतिक्रिया
10
Nashik: येवल्यात छगन भुजबळांच्या 'पंच'मुळे उद्धवसेना 'सलाइन'वर, 'शिंदेसेने'लाही दिला शह
11
एकनाथ शिंदेंच्या तक्रारीनंतर अमित शाहांकडून रवींद्र चव्हाणांची पाठराखण; "पक्षबांधणी सुरूच ठेवा..."
12
२० दिवसापूर्वीच थार घेतलेली, कोकणात फिरण्यासाठी निघाले होते, चौघांचा मृतदेह सापडला, दोनजण बेपत्ता; ओळख पटली, नाव आली समोर
13
Pune Hit And Run: टेम्पोने उडवले, सात वर्षाच्या अनुरागने जागेवरच सोडला जीव, आजोबा आणि भाऊ थोडक्यात बचावले
14
इंग्रज ढासळले...! ब्रिटिश इंडियन्स, उद्योजक ब्रिटन सोडू लागले! अब्जाधीश हरमन नरुला दुबईला स्थायिक होणार
15
“मनसेचा आघाडीचा प्रस्ताव नाही, आम्हाला महाराष्ट्र धर्म शिकवू नये”; काँग्रेस नेत्यांचे उत्तर
16
निवडणूक न लढताच 'जीन्स-शर्ट'मधील तरुणाने घेतली मंत्रिपदाची शपथ! कोण आहेत दीपक प्रकाश?
17
IND vs SA: रोहित-विराट पुन्हा संघात दिसणार, बुमराह बाहेर जाणार; 'या' खेळाडूचाही पत्ता कट?
18
IIT दिल्लीमध्ये देशातील पहिल्या ‘Gen-Z पोस्ट ऑफिस’ची सुरुवात; Wifi, QR द्वारे पार्सल बुकिंग
19
"आता मैदान मोकळं, बघू कोण येतंय!"; संरक्षणातील पोलिसांना परत पाठवत जरांगेंचे आव्हान
20
Tesla Model Y सेफ्टी टेस्टमध्ये 'Pass' की 'Fail'? 5-स्टार रेटिंगमध्ये किती पॉइंट्स मिळाले? जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांनी मतदार यादीत नाव नोंदवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 06:00 IST

दिव्यांग व्यक्तिही समाजाचा अभिन्न अंग असून समाजातील प्रत्येक घटकात त्यांचे समायोजन व्हावे म्हणून निवडणूक प्रक्रि येत त्यांचा महत्त्वाचा सहभाग नोंदविण्याकरीता त्यांनी विधानसभास्तरावर मतदारसंघात बैठक घेण्याचे निर्देश दिले.

ठळक मुद्देकादंबरी बलकवडे : सुलभ निवडणुका जिल्हास्तरीय नियंत्रण समितीची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दिव्यांग व्यक्तीही समाजाचे अभिन्न अंग असून सर्वसामान्यांप्रमाणे त्यांनाही मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार आहे. यामुळे दिव्यांगांनी मतदारयादीत आपले नाव नोंदवावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी केले.मतदारयादीत नव दिव्यांग मतदारांच्या संख्येत वाढ करण्याच्या अनुषंगाने ‘सुलभ निवडणुका’ जिल्हास्तरीय नियंत्रण समिती गठीत करु न जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (दि.२१) घेण्यात आलेल्या विशेष बैठकीत अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. पुढे बोलताना डॉ. बलकवडे यांनी, आगामी विधानसभा निवडणूक २०१९ करिता भारत निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदारांना लोकशाही प्रकियेमध्ये सामावून घेण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दिव्यांग व्यक्तिही समाजाचा अभिन्न अंग असून समाजातील प्रत्येक घटकात त्यांचे समायोजन व्हावे म्हणून निवडणूक प्रक्रि येत त्यांचा महत्त्वाचा सहभाग नोंदविण्याकरीता त्यांनी विधानसभास्तरावर मतदारसंघात बैठक घेण्याचे निर्देश दिले.दिनांक १ जानेवारी २०१९ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणारी व्यक्ति मतदार म्हणून मतदार यादीत आपल्या नावाची नोंद करण्यासाठी मतदान केन्द्रस्तरीय अधिकारी किंवा संबंधित तहसील कार्यालयात संपर्क करु शकतील. मागील लोकसभा निवडणुकीमध्ये मतदार यादीत तीन हजार १०० दिव्यांग मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहे.भारतीय निवडणूक आयोगाने ‘सुलभ निवडणुका’ हे घोष वाक्य जाहिर केले आहे. त्यानुसार दिव्यांग घटकातील प्रत्येक मतदाराला निवडणूक प्रक्रि येमध्ये समावून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.या कार्यक्रमात दिव्यांग मतदारांना निवडणूक प्रक्रियेबाबत तसेच त्यांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांबाबत माहिती देण्यात येईल. तसेच येत्या ३१ ऑगस्ट रोजी मतदारयादी प्रसिद्धी करण्यात येणार आहे.विशेष सोयीसुविधा मिळणार२१ प्रकारचे दिव्यांगत्व असलेल्या नव मतदारांनी आपले नाव मतदार यादीत दिव्यांग म्हणून नोंदवावे. जेणे करु न निवडणूक आयोगामार्फत व मतदान केंद्रावर उपलब्ध असलेल्या विशेष सुविधांचा लाभ दिव्यांग मतदारांना घेता येईल. तसेच इतर नागरिकांनी दिव्यांग नव मतदारांना ज्यांनी १ जानेवारी २०१९ रोजी १८ वर्षे पूर्ण केली आहे त्यांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी प्रवृत्त करावे असेही डॉ. बलकवडे यांनी कळविले आहे. दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा व मतदान प्रकियेशी संबंधित कायदे नियमासाठी, मतदार यादीत नाव व मतदान केंद्र शोधण्यासाठी, ऑनलाईन मतदार नोंदणी, दुरुस्ती, नाव वगळणे इत्यादिसाठी व तक्र ारींसाठी अ‍ॅपद्वारे मदतीची मागणी करता येईल. सदर अ‍ॅप गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहे. अंध मतदार आपले मत देण्यासाठी फॉर्म ४९ (अ) भरुन आपल्यासाठी साथीदाराची मदत घेऊ शकतात.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीElectionनिवडणूक