शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
3
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
6
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
7
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
8
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
9
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
10
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
11
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
12
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
13
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
14
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
15
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
16
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
17
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
18
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
19
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
20
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा

पंतप्रधानांच्या आवाहनाला जिल्हावासीयांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 05:00 IST

संपूर्ण देशच नव्हे तर जग कोरोना विरुध्द लढा देत आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे.कोरोना बाधीत रुग्णांच्या आकड्यात दररोज वाढ होत असून रविवारी महाराष्ट्रातील कोरोना बाधीत रुग्णांचा ६९० च्यावर पोहचला. त्यामुळे संपूर्ण नागरिकांमध्ये दहशतीचे वातारण आहे.

ठळक मुद्देप्रकाशाने उजळून निघाला परिसर : कुणी लावला दिवा तर कुणी सुरू केला मोबाईला टॉर्च, नऊ मिनिटांसाठी लाईट्स केले बंद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाच्या अंधकाररुपी संकटावर १३० भारतीयांच्या एकजुट आणि प्रकाशपर्वातून मात करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना केले होते. यासाठी रविवारी (दि.५) रात्री नऊ वाजता सर्वांनी आपल्या घरातील सर्व लाईट्स बंद करुन दिवे, मेणबत्ती अथवा मोबाईल टॉर्च सुरू ठेवण्याचे आवाहन केले होते. याला जिल्हावासीयांकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. नऊ मिनिटांसाठी सर्वांच्या घरातील लाईट्स बंद असल्याने सर्व परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाल्याचे चित्र होते.संपूर्ण देशच नव्हे तर जग कोरोना विरुध्द लढा देत आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे.कोरोना बाधीत रुग्णांच्या आकड्यात दररोज वाढ होत असून रविवारी महाराष्ट्रातील कोरोना बाधीत रुग्णांचा ६९० च्यावर पोहचला. त्यामुळे संपूर्ण नागरिकांमध्ये दहशतीचे वातारण आहे. कोरोना विरुध्दची लढाई शासन आणि प्रशासन सध्या युध्द पातळीवर लढत आहे. हा लढा अधिक तीव्र करुन देशवासीयांची या लढ्याविरुध्द एकजूट दाखवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी घरातील सर्व लाईट्स बंद करुन मेणबत्ती, दिवे, मोबाईल टॉर्च लावण्याचे आवाहन केले होते.या आवाहनाला गोंदिया शहर आणि जिल्हावासीयांकडून प्रतिसाद मिळाला. या प्रकाशपर्वात जवळपास सर्वच नागरिक सहभागी झाल्याने कोरोनारुपी अंधकारमय वातावरणात प्रकाशरुपी भारतवायीयांच्या एकजुटीने एक प्रकारे विजय मिळविल्याचे चित्र पाहयला मिळाले.या प्रकाशपर्वाची तयारी करण्यासाठी जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधी, युवक आणि नागरिकांकडून फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅपवर संदेश पाठवून दोन तीन दिवसांपूर्वीपासूनच तयार केली जात होती. याचा सुध्दा काही प्रमाणात या प्रकाशपर्वात परिणाम दिसून आला.कुणी अंगणात कुणी लावले गॅलरीत दिवेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील काही नागरिकांनी रात्री नऊ वाजता आपल्या घराच्या गॅलरीत आणि अंगणात दिवे लावले होते. त्यामुळे कोरोनाच्या अंधकारमय वातावरणावर या प्रकाशपर्वाने काहीशी मात केल्याचे चित्र होते.मेणबत्त्या आणि मोबाईलचे टॉर्चरविवारी (दि.५) रात्री नऊ वाजताच अनेक नागरिकांनी आपल्या घराच्या गॅलरीत तर काही घराच्या प्रवेशव्दारासमोर येऊन व हातात मेणबत्त्या तसेच मोबाईल टॉर्च आॅन करुन या प्रकाशपर्वात आपला सहभाग नोंदवून भारतवासीयांच्या एकजुटीचा परिचय दिला.हे प्रकाशपर्वमागील पंधरा ते वीस दिवसांपासून देशात कोरोनाचा कहर आहे. परिणामी सर्वत्र लॉकडाऊन असून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीती आणि काहीसे नैराश्याचे वातावरण आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी रविवारी प्रकाशपर्व साजरे करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत सर्वत्र दिवे लावण्यात आले होते. त्यामुळे सर्वत्र दिवाळीसारखे वातावरण निर्माण झाल्याने हिरमुसलेल्या चेहऱ्यांवर या प्रकाशपर्वामुळे थोडासा आनंद झळकल्याचे चित्र होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या