गोंदिया : कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ८४२८ फ्रंटलाइन योद्ध्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. १५ जानेवारीपासून जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. या अंतर्गत आतापर्यंत एकूण ३२८४ फ्रंटलाइन योद्ध्यांना लसीकरण करण्यात आले असून, कोरोना लसीकरणात गोंदिया जिल्हा राज्यात ११ व्या क्रमांकावर आहे. कोरोना लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सध्या जिल्ह्यातील एकूण सहा लसीकरण केंद्रांवरून लसीकरण केले जात आहे. केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील केंद्रावरून आतापर्यंत सर्वाधिक १०५१ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात १० हजार लस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. आता दुसऱ्या टप्प्यात ८ हजार लस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेसाठी ‘कोविन’ ॲपवर नोंदणी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. कोरोना लसीकरणाचे उद्दिष्ट दिलेल्या कालावधीत पूर्ण करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने नियोजन पूर्ण केले आहे. आतापर्यंत ३२८४ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले असून, लसीकरणामुळे त्रास झाल्याच्या तक्रारी नाहीत. लसीकरण मोहिमेत सध्या गडचिरोली, चंद्रपूर हे जिल्हे गोंदियाच्या पुढे आहेत.
......
जिल्ह्यात आतापर्यंत झालेले लसीकरण
केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय : १०५१
तिरोडा उपजिल्हा रुग्णालय : ५६०
देवरी ग्रामीण रुग्णालय : ५५६
बीजीडब्ल्यू रुग्णालय : २७२
खमारी प्रा. आ. केंद्र : २९१
अर्जुनी माेरगाव ग्रामीण रुग्णालय : ५५४
...............
लस घेण्यात महिला आघाडीवर
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३२८४ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले आहे. यात १२६० पुरुष तर २६४२ महिला आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे कोरोना लस घेण्यात महिला आघाडीवर असल्याचे चित्र आहे. कोरोना लसीकरणानंतर त्रास होत असल्याच्या तक्रारीसुद्धा फारच किरकोळ आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात लसीकरणात जिल्हा पहिल्या क्रमांकावर होता.
.....
१) दुसऱ्या टप्प्यात ८ हजार लस
कोरोना लसीकरणाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील एकूण १८०० हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात जिल्ह्याला १० हजार लस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. आता पुन्हा ८ हजार लस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. लसीकरणाचा डाटा उपलब्ध झाल्यानंतर ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे.
.....
२) कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यातसुद्धा आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी ८ हजार लस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. १ फेब्रुवारीपासून दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. राज्य सरकारकडून निर्देश प्राप्त झाल्यानंतर आणि डाटा उपलब्ध झाल्यानंतर ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे.
....
३) गोंदिया जिल्ह्याला १० हजार लस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यापैकी जवळपास दीड हजार लस शिल्लक राहणार असून, दुसऱ्या टप्प्यात पुन्हा ८ हजार लस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
........
कुठे किती लसीकरण
गोंदिया : ८५.३३ टक्के
गडचिरोली : १०८.७
चंद्रपूर : ७२.५
भंडारा : ८२.१
वर्धा : ९६.५
नागपूर : ६४.९
.......