शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याचा आरोग्य विभाग राज्यात आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 22:06 IST

आरोग्य सेवा व आरोग्यासंदर्भात असलेल्या योजनांचा फायदा गोंदिया जिल्हावासीयांना देण्यात जिल्ह्याचा आरोग्य विभाग यशस्वी ठरला आहे. विविध कामात उत्तम कामगीरी बजावल्यामुळे जिल्ह्याचा आरोग्य विभाग आघाडीवर आहे.

ठळक मुद्देउत्कृष्ट कार्य : प्रधानमंत्री मातृवंदन योजनेत प्रथम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आरोग्य सेवा व आरोग्यासंदर्भात असलेल्या योजनांचा फायदा गोंदिया जिल्हावासीयांना देण्यात जिल्ह्याचा आरोग्य विभाग यशस्वी ठरला आहे. विविध कामात उत्तम कामगीरी बजावल्यामुळे जिल्ह्याचा आरोग्य विभाग आघाडीवर आहे.प्रधानमंत्री मातृवंदन योजनेत पहिल्या टप्प्यात गर्भवती महिलांना ५ हजार रूपये मदत राशी देण्याचे योजनेत नमूद आहे. त्यानुसार गोंदिया जिल्ह्यातील पहिल्या प्रसूतीच्या वेळी महिलांना ५ हजार रूपये देण्यासाठी शासनाने १२ हजार १३५ महिलांचे उद्दीष्टे दिले होते. परंतु गोंदिया जिल्ह्याने उद्दिष्ठापैकी दीड पट काम म्हणजे १४९.९१ टक्के महिलांना मदत दिली आहे.एप्रिल ते मार्च या कालावधीत १२ हजार १३५ महिलांना लाभ द्यायचा होता.परंतु गोंदिया जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने १८ हजार १९२ महिलांना लाभ दिला आहे. हा लाभ देण्यात गोंदिया जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. शिवाय मातामृत्यू व बालमृृत्यूवर आळा घालण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.सन २०१७-१८ या वर्षात १२ माता मृत्यू होते, तो आकडा कमी झाला असून सन २०१८-१९ या वर्षात ५ माता मृत्यू झाले आहेत. सन २०१७-१८ या वर्षात ३९५ बालमृत्यू होते. तो आकडा कमी झाला असून सन २०१८-१९ या वर्षा ३०३ बालमृत्यू झाले आहेत. राज्याच्या मातामृत्यू व बालमृत्यूच्या दरापेक्षा कमी दर गोंदियाच्या आरोग्य विभागाने केला आहे.बालमृत्यू व मातामृत्यूवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच गर्भवती महिलांना सकस आहार देण्यात यावे. जेणेकरून पोटातच बालके कुपोषित होणार नाही याची काळजी आरोग्य विभागाने घेतली आहे. क्षयरोगावरही नियंत्रण आणण्यात आरोग्य विभाग बऱ्यापैकी यशस्वी ठरला आहे.गर्भवतींना प्रसूतीच्या काळात जोखीम पत्करावी लागू नये यासाठी प्रत्येक प्रसूती ही आरोग्य संस्थेतच व्हावी हा आमचा आग्रह आहे. तज्ज्ञ डॉक्टरांची चमू आपल्या मदतीला असून प्रत्येक गर्भवतींना प्रसूतीसाठी आरोग्य संस्थेतच त्यांना दाखल करण्यासाठी नातेवाईकांनी पुढाकार घ्यावा.- डॉ.श्याम निमगडेजिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. गोंदिया.

टॅग्स :Healthआरोग्य