शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा मुख्यालयी नाळ न जुळलेला अर्जुनी-मोर.तालुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 00:01 IST

स्मार्ट सिटी, डिजिटल इंडिया या सारख्या योजना राबवून शहरांचा विकास झाला. मात्र अजूनही नक्षलग्रस्त आदिवासी ग्रामीण भागाकडे शासनाचे दुर्लक्ष आहे.

ठळक मुद्देनागरिकांची होते फरफट : लोकप्रतिनिधी व एस.टी. महामंडळाची वक्रदृष्टी

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : स्मार्ट सिटी, डिजिटल इंडिया या सारख्या योजना राबवून शहरांचा विकास झाला. मात्र अजूनही नक्षलग्रस्त आदिवासी ग्रामीण भागाकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. महाराष्टÑ राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून अद्यापही अर्जुनी-मोरगाव या तालुका स्थळाची जिल्हा मुख्यालयाशी नाळ जुळलेली नाही. महाराष्टÑातला हा असा एकमेव तालुका असल्याचे बोलले जात आहे.भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन १ मे १९९९ रोजी गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली. अर्जुनी-मोरगाव हा आदिवासी, नक्षलग्रस्त तालुका गोंदिया जिल्ह्यात समाविष्ट झाला. हे गोंदिया जिल्ह्यातील अत्यंत वर्दळीचे तालुका मुख्यालय आहे. येथून भंडारा व गोंदिया या दोन्ही जिल्हा मुख्यालयाचे अंतर ८० किमी. आहे. येथून भंडारा जिल्ह्यासाठी थेट व इतर तालुक्यांना जोडणाºया अनेक बसेस आहेत. मात्र गोंदिया जिल्हा मुख्यालयाशी जोडणारी एकही बस उपलब्ध नाही ही शोकांतिका आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे, गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले हे याच मतदारसंघातून निवडून राज्य शासनात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री आहेत.अर्जुनी-मोरगाव हे तालुकास्थळ गोंदिया-बल्लारशाह या रेल्वे मार्गावर आहे. मात्र अपुºया गाड्या व जनतेच्या दृष्टीने गैरसोईचे वेळापत्रक यामुळे जनता कंटाळली आहे. येथील जनतेचा जिल्हा मुख्यालयाशी दैनंदिन संपर्क असतो. मात्र एकही बसफेरी उपलब्ध नाही. रेल्वे दुपारी १२ वाजता गोंदियाला पोहोचते. तत्पुर्वी गोंदिया येथे जाण्यासाठी कुठलीही सुविधा नाही. त्यामुळे कामकाजाच्या निमित्ताने जाणारे लोक, विद्यार्थी, कर्मचारी, व्यापाºयांची चांगलीच तारांबळ उडते.अर्जुनी-मोरगाव तालुका जंगलव्याप्त व विस्तीर्ण आहे. तालुक्यात १३६ आबादी गावे आहेत. ‘गाव तिथे एस टी’ हे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे ब्रिद आहे. मात्र अद्यापही अनेक गावात एस.टी. पोहोचलीचं नाही. तालुक्यात बहुतांश रस्ते पक्के मार्ग व बारमाही वाहतूक होईल असे आहेत. मात्र अद्यापही अनेक गावे तालुका मुख्यालयाशी सुद्धा जुळलेली नाहीत. याचा गैरफायदा घेत अवैध वाहतूक जोमात आहे. अर्जुनी-मोरगाव ते गोंदिया तसेच अर्जुनी-मोरगाव ते जिल्ह्यातील इतर तालुकास्थळे जोडणाºया सबसेवा सुरु करण्यासंबंधाने तालुक्यातील सुज्ञ नागरिकांची आमदार, खासदार, मंत्र्यापासून एस.टी. महामंडळाच्या अधिकाºयांना १५ एप्रिल रोजी स्थानिक पंचायत समितीच्या ठरावासह निवेदन दिले. मात्र त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही.समृद्ध तालुकाअर्जुनी-मोरगाव हा पर्यटन, व्यवसाय, शैक्षणिक, सांस्कृतिक दृष्ट्या गोंदिया जिल्ह्यातील अग्रणी तालुका आहे. मात्र राजकीयदृष्ट्या दुर्लक्षीत आहे. येथील धानाचा व्यापार सर्वदूर प्रसिद्ध आहे. तालुक्यात २८ राईस मिल असून त्या गोंदिया बाजारपेठेशी संलग्नीत आहेत. गोठणगाव येथे महाराष्टÑातील एकमेव शरणार्थी तिबेटीयनांची वसाहत आहे. अरुणनगर, गौरनगर, रामनगर, संजयनगर, दिपकनगर तसेच पुष्पनगर ‘अ’ व ‘ब’ या आश्रीत बंगाली बांधवांच्या वसाहती आहेत. नवेगावबांध राष्टÑीय उद्यान, प्रतापगड, इटियाडोह धरण, झाशीनगर उपसा सिंचन योजना हे तालुक्याचे वैभव आहे. मात्र एवढे सारे काही असूनही या तालुक्याची नाळ गोंदिया जिल्हा मुख्यालय तसेच इतर तालुकास्थळाशी थेट बारमाही एस.टी. बसच्या माध्यमातून जुळलेली असू नये याचे नवल वाटते.महामंडळाचा महागडा सल्लाअर्जुनी-मोरगाव ते सडक-अर्जुनी या मार्गावर अनेक वेळा बस सुरु करुनही फेºयांना प्रवासी नसल्याने नाईलाजास्तव वाहतूक बंद करण्यात आली. अर्जुनी-मोरगाव ते साकोली दरम्यान दिवसभरात एकूण १५ नियमित फेºया व मानव विकास सेवेअंतर्गत शालेय विद्यार्थिनींच्या सोयीसाठी ७ फेºयांची वाहतूक सुरु आहे. तसेच साकोली ते गोंदिया जिल्ह्याच्या इतर तालुक्यात जाणाºया बसेस सरासरी १० ते ३० मिनिटांच्या अंतराने सुरु आहे. या फेºयांचा प्रवाशांनी लाभ घेण्याचे आवाहन भंडाराच्या विभागीय वाहतूक अधिकाºयांनी केले आहे. मात्र वळसा घालून तिप्पट खर्चाने साकोलीमार्गे प्रवास करण्याचा हा लेखी सल्ला येथील प्रवाशांना मान्य नाही. उलट या सल्ल्याने प्रवाशी संतप्त आहेत. १७ जानेवारी २०१५ रोजी अर्जुनी-मोरगाव-यवतमाळ ही लांब पल्ल्याची बस सुरु करण्यात आली होती. ती सुद्धा काही कालावधीतच बंद करण्यात आली. म.रा. परिवहन महामंडळाच्या नाकर्तेपणामुळे अर्जुनी-मोरगाव येथून सकाळी नागपूरला ४ ते ५ लक्झरी बसेस सुरु आहेत.