लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : खरीप हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक अडचण जावू नये यासाठी शेतकऱ्यांना बँकांच्या माध्यमातून पीक कर्जाचे वाटप केले जाते. यंदा गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला दिलेले १३६ कोटी ६२ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे दिलेले उद्दिष्ट या बँकेने पूर्ण केले आहे. तर राष्ट्रीयकृत बँका अद्यापही पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्टापासून बऱ्याच दूर असल्याचे चित्र आहे.खरीप आणि रब्बी हंगामात शेतकरी सर्वाधिक पीक कर्जाची उचल जिल्हा बँकेतून करीत असतात. या बँकेतून पीक कर्जाची उचल करण्याची प्रक्रिया फारशी किचकट नसल्याने ही बँक शेतकऱ्यांना आपली वाटते. खरीप हंगामात पीक कर्ज वाटपात जिल्हा बँकेने सुरूवातीपासूनच आघाडी घेतली होती. ती कायम ठेवित उद्दिष्टापेक्षा अधिक पीक कर्जाचे वाटप केले आहे. नार्बाड आणि शासनाने यंदा जिल्हा बँकेला १३६ कोटी ६२ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले होते. यापैकी जिल्हा बँकेने आतापर्यंत एकूण १३६ कोटी ६४ लाख रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप करीत उद्दिष्टपूर्ती केली आहे.ग्रामीण बँकांना २८ कोटी आठ लाख रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले होते. यापैकी २५ कोटी २० लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. तर राष्ट्रीयकृत बँकांना १०५ कोटी ३० लाख रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले होते. यापैकी ३५ कोटी २८ लाख रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप केले आहे.राष्ट्रीयकृत बँका पीक कर्जाच्या उद्दिष्टापासून अद्यापही बऱ्याच लांब असल्याने यंदाच्या हंगामात या बँकांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करणे कठीण असल्याचे चित्र आहे. राष्ट्रीयकृत बँकांमधून पीक कर्जाची उचल करण्याची प्रक्रिया फारच किचकट आहे. त्यामुळे बरेच शेतकरी सुद्धा या बँकामधून पीक कर्जाची उचल करणे टाळत असल्याचे चित्र आहे.आतापर्यंत जिल्हा बँकेतून शेतकऱ्यांनी सर्वाधिक पीक कर्जाची उचल केली आहे. तीन्ही बँकांनी मिळून आतापर्यंत एकूण ४१ हजार शेतकºयांना १९७ कोटी १३ लाख ५९ हजार रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप केले आहे.
पीक कर्ज वाटपात जिल्हा बँकेची उद्दिष्टपूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 5:00 AM
खरीप आणि रब्बी हंगामात शेतकरी सर्वाधिक पीक कर्जाची उचल जिल्हा बँकेतून करीत असतात. या बँकेतून पीक कर्जाची उचल करण्याची प्रक्रिया फारशी किचकट नसल्याने ही बँक शेतकऱ्यांना आपली वाटते. खरीप हंगामात पीक कर्ज वाटपात जिल्हा बँकेने सुरूवातीपासूनच आघाडी घेतली होती. ती कायम ठेवित उद्दिष्टापेक्षा अधिक पीक कर्जाचे वाटप केले आहे. नार्बाड आणि शासनाने यंदा जिल्हा बँकेला १३६ कोटी ६२ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले होते.
ठळक मुद्देराष्ट्रीयीकृत बँका उद्दिष्टापासून दूर : ४१ हजार शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप