शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

शंभर कोटीच्या निधी अभावी रखडले बोनसचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 23:25 IST

जिल्ह्यात खरीपात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळातंर्गत हमीभावानुसार धान खरेदी केली जाते. ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यातील एकूण ७० धान खरेदी केंद्रावरुन ३५ लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली होती. जिल्ह्यातील एकूण ९५ हजार ७३४ शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली होती.शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० क्विंटलपर्यंत ७०० रुपये प्रती क्विंटल प्रमाणे बोनस देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती.

ठळक मुद्दे११३ कोटीचे वाटप पूर्ण । शासनाकडून निधी मिळण्यास विलंब

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० क्विंटलपर्यंत बोनस देण्यात येणार होते. यात ५०० रुपये बोनस आणि २०० रुपये प्रती क्विंटल दरात केलेली वाढ असे एकूण ७०० रुपये बोनस मिळणार आहे. यातंर्गत शासकीय धान खरेदी केंद्रावर धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना आतापर्यंत ११३ कोटी रुपयांच्या बोनसचे वाटप करण्यात आले आहे. मात्र १०० कोटी रुपयांचा निधी प्राप्त न झाल्याने बोनसचे वाटप रखडले आहे.जिल्ह्यात खरीपात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळातंर्गत हमीभावानुसार धान खरेदी केली जाते. ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यातील एकूण ७० धान खरेदी केंद्रावरुन ३५ लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली होती. जिल्ह्यातील एकूण ९५ हजार ७३४ शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली होती.शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० क्विंटलपर्यंत ७०० रुपये प्रती क्विंटल प्रमाणे बोनस देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती.त्यानुसार जिल्ह्यातील एकूण ९५ हजार ७३४ शेतकऱ्यांना बोनसची रक्कम वाटप करण्यासाठी २१३ कोटी रुपयांच्या निधीची गरज होती. यापैकी पंधरा दिवसांपूर्वी शासनाने ११३ कोटी रुपयांचा निधी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला उपलब्ध करुन दिला होता. त्यानंतर बोनसचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केला जात आहे. शेतकऱ्यांना बोनस वाटप करण्यासाठी पुन्हा १०० कोटी रुपयांची गरज आहे. मात्र शासनाकडून मागील पंधरा दिवसांपासून हा निधी न मिळाल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना बोनस मिळण्याची प्रतीक्षा कायम आहे.एकीकडे लॉकडाऊन आणि संचारबंदी तर दुसरीकडे खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीची कामे करण्यासाठी पैशाची गरज आहे.त्यामुळे बोनसची रक्कम लवकर मिळाल्यास शेतकऱ्यांना तेवढीच मदत होणार असल्याने सर्व शेतकºयांच्या नजरा सध्या याकडे लागल्या आहे.६ लाख बारदाना आला मात्र खरेदी सुरु होईनारब्बी हंगामातील धान खरेदी सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले असून एकूण ७० धान खरेदी केंद्रावरुन खरेदी केली जाणार आहे. यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला ६ लाख बारदाना सुध्दा उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मात्र आदेशानंतरही बºयाच केंद्रावर धान खरेदी सुरू झाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.खरेदी केंद्रावर करावी लागणार जंतुनाशक फवारणीकोरोनाचा प्रादुर्भाव आणि धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची होणारी गर्दी लक्षात घेवून खबरदारीचा उपाय म्हणून खरेदी केंद्रावर दिवसांतून दोनदा जंतूनाशक फवारणी करण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. तसेच खरेदी केंद्रावर सॅनिटायझरची व्यवस्था करण्याचे सूचना दिल्या.गर्दी टाळण्यासाठी टोकन पध्दतीने धान खरेदी करावी असे निर्देश सुध्दा जिल्हा प्रशासनाने सर्व खरेदी केंद्र संचालकांना दिले आहे.शासकीय धान खरेदी केंद्रावर धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना बोनसची रक्कम वाटप करण्यासाठी आत्तापर्यंत ११३ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वळता करण्यात आला आहे.बोनस वाटपासाठी पुन्हा शंभर कोटी रुपयांची गरज असून निधी प्राप्त होताच बोनस वाटप केले जाईल.- गणेश खर्चेजिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड