शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

सचिवांच्या आदेशाची बँकांकडून अवहेलना; लाडक्या बहिणींच्या खात्यातून केली पैशांची कपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 16:07 IST

Gondia : कित्येक बहिणींना बसला फटका

कपिल केकत लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : खात्यात तीन हजार रूपये येणार, आपली राखी गोड होणार... अशी आशा बाळगून असलेल्या कित्येक बहिणींचा अपेक्षा भंग बँकांनी केल्याचे आता उघड होत आहे. लाडकी बहीण योजनेंतर्गत खात्यात जमा होणाऱ्या तीन हजार रुपयांतून कसलीही कपात करू नये, असे आदेश राज्य शासनाच्या सचिवांना दिले आहेत. मात्र, बँकांनी त्यांच्या आदेशाची अवहेलना करीत खात्यात आलेल्या रकमेतून विविध प्रकारे कपात केली आहे. परिणामी बहिणींचा राखीचा सण कड झाला आहे.

राज्यातील महिलांना मदतीचा हात म्हणून राज्य शासनाने 'मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण' योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलेला दरमहा १५०० दिले जाणार असून, ते थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. ३१ ऑगस्टपर्यंत या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुदत देण्यात आली असून, जिल्ह्यात दोन लाखांवर महिलांनी आपला अर्ज केला होता. विशेष म्हणजे, १९ ऑगस्ट रोजी राखीचा सण होता व बहिणीला भेट म्हणून शासनाने त्यापूर्वीच त्यांच्या खात्यात तीन हजार रूपये जमा करणार असे सांगितले होते. त्यानुसार, काही अर्ज रद्द करून व काही त्रुटीपूर्तीसाठी वेगळे केल्यानंतरही जिल्ह्यात दोन लाखांवर महिलांच्या खात्यात प्रत्येकी तीन हजार रूपये जमा करण्यात आले. विशेष म्हणजे, कित्येक महिलांच्या खात्यातून नियमित व्यवहार होत नसल्याने त्यांचे खाते बँकांकडून बंद केले जातात तर कित्येक महिलांच्या खात्यातून त्यांच्या कर्जाची किश्त कपात होते. मात्र, लाडकी बहीण योजनेतून हस्तांतरित केलेली रक्कम कोणत्याही कर्जाच्या बदल्यात समायोजित केली जाऊ नये, असे स्पष्ट आदेश होते. मात्र, यानंतरही बँकांनी महिलांच्या खात्यात रक्कम जमा होताच विविध बाबींवर रक्कम कपात करून टाकली. परिणामी कित्येक महिलांच्या खात्यातून आलेले तीन हजार रूपये लगेच कपात झाल्याचे दिसून येत आहे. यावरून बँकांनी चक्क राज्य शासनाच्या सचिवांच्या आदेशाचीच अवहेलना केल्याचे दिसत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करण्याची गरजराज्याच्या सचिवांच्या आदेशानंतरही बहिणींच्या खात्यातील रक्कम कपात करण्यात आली आहे. अशात सर्वसामान्य महिला या विषयात काहीच करू शकणार नाहीत हे सुद्धा तेवढेच खरे आहे. म्हणूनच आता जिल्हाधिकाऱ्यांनी यावर काही तरी तोडगा काढावा, अशी मागणी केली जात आहे. 

काय आहेत सचिवांचे आदेश 

  • राज्याचे सचिव डॉ. अनुप यादव यांनी काढलेल्या आदेशानुसार, लाडकी बहीण योजनेतून हस्तांतरित केलेली रक्कम कोणत्याही थकीत कर्जाच्या बदल्यात समायोजित केली जाऊ नये. ही रक्कम विशिष्ट उद्देशासाठी असून ती इतर कर्ज समायोजनासाठी वापरता येणार नाही. 
  • ही रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग केल्यानंतर लाभार्थी महिलांना कोणत्याही थकबाकीच्या समायोजनेमुळे रक्कम काढण्यास नकार देण्यात येऊ नये. 
  • काही लाभार्थ्यांकडे बँकेच्या प्रलंबित असलेल्या कर्जाची परतफेड न ३ केल्यामुळे बैंक खाते गोठविण्यात आले असल्यास बँक खाते तात्काळ सुरु करण्यात यावे व या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना प्राप्त होणारी लाभाची रक्कम उपलब्ध करून देण्यात यावी.

बँक सिस्टमनुसार रक्कम कपात कित्येक खातेदारांचे खाते नियमित व्यव मुख्यमंत्री हाराअभावी बंद पडले होते व योजनेची रक्कम येताच त्यातून पैशांची कपात करण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत. यावर मात्र बँक सिस्टमनुसार ती रक्कम कपात करण्यात आली असून, आमच्या हातात काहीच नसल्याचे एका बँकेच्या व्यवस्थापकांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. आता त्यांनी आपली बाजू मांडल्यानंतर शासन आदेशाचे बँक व्यवस्थापनाकडूनच पालन होत नसल्याचे स्पष्ट दिसून येते.

टॅग्स :gondiya-acगोंदिया