शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

आठ महिन्यांत १५ क्षय रूग्णांचा मृत्यू

By admin | Updated: December 18, 2014 22:57 IST

जिल्ह्यात क्षयरूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तर एप्रिल ते नोव्हेंबर २०१४ या आठ महिन्यांच्या कालावधीत १५ लोकांचा मृत्यू क्षयरोगाने झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या आठ महिन्यांत झालेल्या

गोंदिया : जिल्ह्यात क्षयरूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तर एप्रिल ते नोव्हेंबर २०१४ या आठ महिन्यांच्या कालावधीत १५ लोकांचा मृत्यू क्षयरोगाने झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या आठ महिन्यांत झालेल्या विविध तपासणीतून सदर संख्या उपलब्ध झाली आहे. या कालावधीत गोंदिया जिल्ह्यात क्षयरोग कॅट-१ चे ६५० रूग्ण, कॅट-२ चे १२७ रूग्ण, एमडीआरचे ७१ रूग्ण व एक्सडीआरचा एक रूग्ण आढळला आहे. एमडीआर व एक्सडीआर क्षयरोग अत्यंत धोकादायक व जीवघेणा असतो. एमडीआर क्षयरोगाच्या ७१ रूग्णांपैकी १५ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. ११ रूग्ण औषधी सेवनात अनियमित आढळले आहेत. त्यातच १३ रूग्णांच्या स्थितीत सुधारणा झालेला आहे. तसेच सहा रूग्णांवर औषधोपचाराचा काहीही प्रभाव झाला नसल्याचे सांगण्यात आले.जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. विनोद वाघमारे यांनी सांगितले की, अशा रूग्णांवर उपचारादरम्यान काहीही प्रभाव होत नाही. एवढेच नव्हे तर त्यांच्यावर औषधीसुद्धा काहीही काम करीत नाही. त्यामुळे अशा रूग्णांना तीच औषधी उपलब्ध करून देण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. एमडीआरच्या रूग्णांपैकी दोन रूग्ण असे आहेत की ते तपासणीसाठी थुंकीचे नमुणेसुद्धा देत नाहीत. यापैकी एक रूग्ण जिल्ह्याबाहेरील आहे. तर दुसरा रूग्ण एक्सडीआरमध्ये बदललेला असून २२ रूग्णांवर उपचार सुरू आहे. (प्रतिनिधी)