शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.च्या ५७ शाळांचा वीजपुरवठा डिसकनेक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 21:53 IST

जि.प.शिक्षण विभागाने जिल्ह्यातील जि.प.च्या सर्व शाळा शंभर टक्के डिजिटल झाल्याचा दावा करीत स्वत:ची पाठ थोपाटून घेतली. मात्र जि.प.च्या ५७ शाळांचा विद्युत पुरवठा वीज बिल न भरल्याने खंडित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देडिजिटल धोरणाला फटका : विद्युत बिल थकीत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जि.प.शिक्षण विभागाने जिल्ह्यातील जि.प.च्या सर्व शाळा शंभर टक्के डिजिटल झाल्याचा दावा करीत स्वत:ची पाठ थोपाटून घेतली. मात्र जि.प.च्या ५७ शाळांचा विद्युत पुरवठा वीज बिल न भरल्याने खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे जि.प.शिक्षण विभागाचा दावा किती खरा याची सुध्दा पोलखोल झाली आहे.जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी ज्ञानरचनावाद, वाचन आनंद दिवस, प्रेरणा दिवस, अध्ययन कुटी, दप्तर विरहित दिवस आदी उपक्रम राबविले जात आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या १०६५ शाळांपैकी सर्वच शाळा डिजिटल झाल्याचा दावा शिक्षण विभागाने केला. तसेच याच आधारावर शिक्षणाधिकारी व या विभागाच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडून स्वत:ची पाठ थोपाटून घेतली. मात्र प्रत्यक्षात जि.प.प्राथमिक शिक्षण विभागात बराच सावळा गोंधळ सुरू असून विविध उपक्रमाच्या माध्यमातून त्यावर पांघरुन घालण्याचे काम केले जात आहे. जिल्ह्यातील ५७ शाळांचा विद्युत पुरवठा विद्युत वितरण कंपनीने थकीत वीज बिलामुळे खंडीत केला. याला आता तीन ते चार महिन्यांचा कालावधी लोटला मात्र अद्यापही थकीत बिलाचा भरणा न केल्याने या शाळांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला नाही. त्यामुळे या शाळांमधील कम्प्युटर धूळखात पडले आहे. मात्र सदैव प्रसिध्दीच्या झोतात राहणाऱ्या या विभागाच्या अधिकाऱ्यांनी अद्यापही विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी कुठलाच पाठपुरावा केला नाही. ज्या शाळांचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. त्यामध्ये गोंदिया तालुक्यातील १४, देवरी १३, सालेकसा १२, सडक अर्जुनी ११, आमगाव ४ आणि गोरेगाव तालुक्यातील ३ शाळांचा समावेश आहे. केवळ अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सर्व शाळांचा विद्युत पुरवठा सुरळीत आहे.जिल्हा परिषद शाळांना सादील फंडाच्या नावावर वार्षिक निधी उपलब्ध करुन दिला जातो. मात्र यातून शाळेची देखभाल दुरूस्ती आणि इतर कामावर खर्च करावा लागतो. मिळणाºया निधीच्या तुलनेत खर्च अधिक असल्याने बरेचदा शाळेच्या मुख्याध्यापकांसमोर पेच निर्माण होतो. त्यामुळे मुख्याध्यापकांनी या निधीत वाढ करण्याची मागणी अनेकदा केली मात्र त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही.

टॅग्स :Schoolशाळाelectricityवीज