परसवाडा : जि.प. शाळांतील मुलांना मध्यान्ह भोजन मिळावे यासाठी शासनाने शालेय पोषण आहार देण्याची योजना सुरू केली. परंतु परसवाडा केंद्रातील चांदोरी खुर्दटोला येथील जि.प. प्राथमिक शाळेत अळ्या लागलेला निकृष्ट दर्जाचा पोषण आहार दिला जात आहे. या प्रकाराचे प्रत्यक्षदर्शी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य घनश्याम मेश्राम हे सुद्धा आहेत. प्राप्त माहितीनुसार ,शाळा समिती सदस्य यांनी शाळेत भेट दिली असता मुख्याध्यापक हिरापूरे गैरहजर होते. सहा. शिक्षिका गोंदुळे अध्यापन कार्य करीत होत्या. सदस्यांनी पोषण आहार किचन शेडमध्ये जावून शिजवलेले अन्न बरोबर आहे किंवा नाही याची सहानिशा करीत असताना मदतनीस यांनी तो शिजविलेला आहार पाहण्यास मनाई केली. सदस्याने डाळ पाहिली असता निकृष्ट दर्जाची आढळली. अळीयुक्त डाळ दिसताच सदस्य मेश्राम यांनी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष बेनिराम गोंदुळे व हरिचंद वैद्य व अन्य सदस्यांना बोलाविले. मुख्याध्यापक याचवेळी आले असता डाळ निकृष्ट दर्जाची आढळली. विस्तार अधिकारी शिक्षण साकुरे यांनीही बघितले व पाहून लगेच निघून गेले. पण विस्तार अधिकारी साकुरे यांनी दुर्लक्ष केले. विद्यार्थ्यांना हा आहार कोण देतो हा प्रश्न कायम आहे.
चांदोरी शाळेत अळ्या लागलेला आहार
By admin | Updated: August 28, 2014 23:53 IST