शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

२० रुपयांत दोन लाखांचा विमा तुम्ही काढला का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 15:41 IST

सर्वसामान्यांना योजना लाभदायक : बँक खातेधारक घेत आहेत लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : केंद्र शासनाच्या वतीने २०१५ पासून प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना राबविली जात आहे. त्याअंतर्गत वार्षिक २० रुपयांत दोन लाखांचा विमा दिला जातो. प्रत्येक राष्ट्रीयीकृत बँकांकडून या योजनेसाठी अर्ज दाखल केला जाऊ शकतो. प्रतिदिवसासाठी केवळ पाच पैसे अशा दराने विमा खर्च होत असल्याने सर्वसामान्यांसाठी ही योजना लाभदायक ठरत आहे.

२० रुपयांत दोन लाखांचा विमाजेव्हा ही पीएम सुरक्षा योजना सुरू केली होती तेव्हा वार्षिक १२ रुपये प्रीमियम घेतला जात होता. त्यात आता वाढ झाली असून, या योजनेसाठी वार्षिक २० रुपये प्रीमियम घेतला जात आहे. या योजनेंतर्गत अपघाती मृत्यू झाल्यास किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास विमाधारकास दोन लाखांचा विमा मिळतो. लाभ घेण्यासाठी प्रत्येक वर्षी नूतनीकरण करणे आवश्यक आहे.

एकावेळीच विमा■ एकाच व्यक्तीचे चार-पाच बचत बँक खाते असते. त्यामुळे पीएम सुरक्षा विमा योजनेसाठी कोणत्याही एकाच बँकेतून विमा योजनेसाठी अर्ज करता येतो. १८ ते ७० वय असणारे नागरिक या विमा योजनेसाठी पात्र ठरतील.

काय आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना?■ प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ९ मे २०१५ रोजी सुरू करण्यात आली. जे नागरिक विम्याच्या कक्षेत आले नाहीत त्यांना विमा मिळावा यासाठी ही योजना सुरू करण्यात आली.■ सर्वसामान्य व गोरगरीब लोकांचा या योजनेत समावेश करून घेण्यासाठीचा प्रयत्न केंद्र शासनाकडून केला जात आहे.

अटी काय?■ हा विमा प्रत्येक राष्ट्रीय बँकेकडून काढला जाऊ शकतो. विमा काढण्यासाठी संबंधित बँकेत खाते असणे आवश्यक आहे.■ १ जून ते ३१ मे असा विमा योजनेचा कालावधी असतो. ऑफलाइन किंवा ऑनलाइन विमा काढता येतो.

 

टॅग्स :government schemeसरकारी योजनाgondiya-acगोंदिया