शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

बाळाच्या जन्मानंतर आरसीएच नोंदणी केली का? आई व बाळाला असणार फायदा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 17:23 IST

Gondia : बाळाच्या आरोग्यासाठी पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : ग्रामीण भागात अद्यापही गर्भवतींना पुरेशा आरोग्याच्या सोयी- सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे आरोग्य विभागाने गर्भवती आणि बाळाच्या स्वास्थ्यासाठी आरसीएच (प्रजनन आणि बाल आरोग्य) पोर्टलची संकल्पना मांडली आहे. या पोर्टलवर माता व बाल स्वास्थ्याशी संबंधित महत्त्वपूर्ण सेवा पुरविल्या जातात. बाळ होण्याची गुड न्यूज समजताच गरोदर मातेने तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क साधून आरसीएच पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

आरसीएच पोर्टमध्ये गर्भवती महिलांच्या तपासणीपासून ते नवजात बाळाच्या लसीकरणापर्यंत सर्व माहिती डिजिटल स्वरूपात नोंद‌विली जाते. नोंदणीनंतर महिलांना आरसीएच नंबर मिळतो. सकस आहार, आरोग्य तपासणी, प्रधानमंत्री वैद्यकीय सहायता निधी, महात्मा फुले जनआरोग्य योजना, जननी सुरक्षा योजना व इतर आरोग्य विभागाच्या योजनाचा लाभ उपलब्ध करून दिला जातो. 

नोंदणी का गरजेची ? गर्भवतींची सविस्तर आरोग्य नोंद ठेवता येते. गर्भावस्थेदरम्यान नियमित तपासणीची आठवण राहते. सरकारी योजनांचा लाभ थेट गर्भवती व नवजात बाळापर्यंत पोहोचत असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

आई व बाळाला हा होईल फायदा सुरक्षित प्रसूतीसाठी मार्गदर्शन, बाळाच्या लसीकरणाची नोंद, बाळ, आईचे पोषण व वैद्यकीय सेवा सहज उपलब्ध होते.

आरसीएच पोर्टल काय आहे?आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने माता व बाल आरोग्य संबंधित सेवांची माहिती मिळविण्यासाठी प्रजनन व बाल आरोग्य (आरसीएच) पोर्टल सुरू केले.

आरसीएच म्हणजे गर्भवतींची हेल्थ कुंडली आरसीएच पोर्टल ही गरोदर महिलांसाठी हेल्थ आरोग्य कुंडली आहे. त्यामध्ये गर्भवतींचे वय, वजन, रक्तदाब, हिमोग्लोबीन, तपासणीचे अहवाल आणि प्रसूतीच्या तारखेची नोंद केली जाते. या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाकडून आरोग्य विभागाच्या योजनांचा लाभ मिळणे सुलभ होते.

"माता व बाळाचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी आरसीएच पोर्टलचा वापर करणे आवश्यक आहे. या पोर्टलच्या माध्यमातून आरोग्य योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल." - डॉ. नितीन वानखेडे, जिल्हा आरोग्य अधिकारी, गोंदिया.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाgondiya-acगोंदिया