लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जगात बौद्ध धम्माचे अनुयायी शांतीदूत बनून अहिंसेचा संदेश प्रचारित करीत आहेत. त्यामुळेच आज पूर्ण जगात हिंसेचे वातावरण संपविण्याची ताकद भगवान बुद्धांच्या धम्मात असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.शहरातील संजयनगरात नवयुवक बौद्ध सेवा समितीच्यावतीने आयोजीत ६१ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी, राजकारणात सतत काम करीत असताना यासारख्या सामाजिक कार्यक्रमांतून मनाला शांती मिळते. तसेच धम्मापासून प्रेरीत होऊन लोकहितांची कामे करण्याची प्रेरणा मिळते. यातूनच धम्माच्या अनुयायांनी प्रत्येक परिस्थितीत माझ्यावर विश्वास कायम केला आहे, त्यातूनच बौद्ध समुदायाच्या विकास कामांना प्रामुख्याने पुढे वाढविले जात आहे. आम्ही क्षेत्रातील सामान्य नागरिकांची लढाई लढण्याचे काम करून विकासाच्या माध्यमातून जनतेत पकड कायम केली आहे. मात्र काही बडबोले नेते जनतेत शक्ती प्रदर्शन करून आपले महत्त्व कायम करण्याची इच्छा बाळगत असून जनतेला याची जाणीव असल्याचे मत व्यक्त केले.या कार्यक्रमानिमित्त नागपूरच्या महेंद्र-विरेंद्र बोरडे यांच्या ग्रुपच्या संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संचालन आयोजक देवा रूसे यांनी केले. आभार समितीचे अध्यक्ष मनिष रामटेके यांनी मानले.कार्यक्रमाला नगरसेवक भागवत मेश्राम, सुनील तिवारी, बंटी बानेवार, विष्णू नागरीकर, अनील सुखदेवे, सुशिल ठवरे, राजेश कापसे, अपूर्व अग्रवाल, यशपाल डोंगरे, ज्योतीप्रकाश गजभिये, सतीश मेश्राम, विजय बावनकर, श्याम चौरे, अनील डोंगरे, दिलीप बोरकर, विकास चव्हाण, बंटी भालाधरे, आकाश गडपायले, नितीन डोंगरे, अजय मोरे, मनोज डहाट, विनोद कांबळे, गौतम डहाट, राजेंद कांबळे, गौतम रंगारी, मयूर मेश्राम, दिनेश उके, संजय गणवीर, सतीश कावडे, लक्ष्मीकांत डहाट, आनंद राहूलकर यांच्यासह मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते.
हिंसेचे वातावरण संपविण्याची शक्ती धम्मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 20:35 IST
जगात बौद्ध धम्माचे अनुयायी शांतीदूत बनून अहिंसेचा संदेश प्रचारित करीत आहेत.
हिंसेचे वातावरण संपविण्याची शक्ती धम्मात
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : संजयनगर येथील धम्मचक्र प्रवर्तन दिवस थाटात