शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

दत्तक गाव पाथरीचा विकास आराखडा झाला तयार

By admin | Updated: February 15, 2015 01:25 IST

खासदार व माजी केंंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी पाथरी गावाला दत्तक घेतले. खासदारांनी गावाचा विकास आराखडा तयार केला.

कुऱ्हाडी : खासदार व माजी केंंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी पाथरी गावाला दत्तक घेतले. खासदारांनी गावाचा विकास आराखडा तयार केला. या गावात कोणती कामे होणार यांचा समावेश त्या आराखड्यात आहे. जि.प. उच्च प्राथमिक शाळेला आवार भिंत व स्वच्छ सुलभ शौचालय, बसस्थानक येथे शौचालय बांधकाम, भुताईटोला येथे हनुमान चौकात शौचालय बांधकाम, स्मशान घाटावर बर्निंग शेड, सभामंडप, पानघाट, भुताईटोला बोडी खोलीकरण, पाथरी बांधतलावाचे खोलीकरण, पाथरी गावातलावाचे खोलीकरण व धोबीघाट बांधकाम, जि.प. उच्च प्राथमिक शाळा पाथरी येथे कम्प्युटर ई लर्निंग सेवा, पाथरी येथील २८ पिण्याच्या पाण्याच्या विहिराचे तोडींचे बांधकाम, भुताईटोला येथे १८ विधंन विहिरीचे गटारे व खड्डे बांधकाम, हिरामन बडगाये ते कुवरलाल भोयर यांच्या शेतापर्यंत पांदण रस्ता बांधकाम, स्व. उपचंद पटले ते परसराम परतेती यांच्या शेतापर्यंत पांदण रस्ता बांधकाम, बबु कुरैशी ते गफारभाई शेख यांच्या शेतापर्यंत पांदणरस्ता बांधकाम होणार आहेत. सर्व बांधकामाचे भूमिपूजन १७ फेब्रुवारी २०१५ ला दुपारी १२.४० पासून भूमिपूजन होणार आहे. सर्व कामे पुर्ण झाल्यावर किंवा वेळेवर येणारे अधिक विकास कामांना मंजूरी पुन्हा मिळणार असल्याची माहिती आयोजक केवलराम बघेले, सरपंच आशा खांडवाये व ग्रामसेवक सी.ए. रहांगडाले यांनी दिले.या कामांच्या बरोबरच केवलराम बघेले यांच्याकडून पाथरी शाळेच्या इयत्ता १ ते ७ वी पर्यंतच्या सर्व १५० विद्यार्थ्यांना वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले. गावातील ६५ वय पुर्ण झालेल्या जेष्ठ नागरिकांचा शाल, श्रीफळ देऊन नागरी सत्कार करण्यात येईल. यात ६५ वर्ष वय ओलांडलेल्या एकून पाथरी भुताईटोला येथील २०० पुरुष-स्त्री सन्मानित होतील. गावकऱ्यांना आपल्याच गावात सर्व सुविधा मिळण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकरी मेळावा, कृषी प्रदर्शनी, पशुचिकित्सा शिबिर, मोफत आरोग्य तपासणी शिबिर, माझे गाव स्वच्छ गाव मोहीम, बचतगट मेळावा, हळदी कुंकु कार्यक्रम, लोकजन जागृती अभियांनातर्गत श्रावणबाळ योजना, संजयगांधी निराधार योजना, मोफत शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. रंगमंचाचे लोकार्पण तायक्वांडो स्पर्धा, पॅन कार्ड बनविण्याचे कॅम्प, अंधश्रद्धा निर्मुलन कार्यक्रम व स्वच्छ भारत मिशन शासनाच्या विविध योजना-मार्गदर्शक तज्ञाकडून मार्गदर्शन अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन गावातील सर्व स्तरातील ग्रामस्थांना माहिती देण्यात येईल. गावाच्या विकासाबरोबरच गावकऱ्यांचा बौधिक मानसिक, आर्थिक व शैक्षणिक विकास साधण्यांचा प्रयत्न केला जाणार आहे. पाथरी पिण्याचे पाणी व शेतीला जलसिंचन करण्यात येईल अशी बहुउद्देशिय योजना पाथरी गावात अंमलात येणार आहे. (वार्ताहर)