शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी कटीबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 22:20 IST

केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी व विकासाच्या योजना आहेत. या योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक वाढविण्यावर आपला भर आहे. या योजनांचा जिल्ह्यातील नागरिकांना लाभ देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आपण कटीबध्द असल्याची ग्वाही पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी दिली.

ठळक मुद्देपालकमंत्री : मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार, जिल्ह्यातील मान्यवरांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी व विकासाच्या योजना आहेत. या योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक वाढविण्यावर आपला भर आहे. या योजनांचा जिल्ह्यातील नागरिकांना लाभ देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आपण कटीबध्द असल्याची ग्वाही पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी दिली.गुरूवारी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त कारंजा येथील पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रामुख्याने जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, भारतीय प्रशासकीय सेवेतील परिविक्षाधिन अधिकारी रोहन घुगे, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे क्षेत्रसंचालक रामानुजम, उपवनसंरक्षक एस.युवराज, माजी खा. डॉ. खुशाल बोपचे, माजी आ.खोमेश्वर रहांगडाले, अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे,जि.प.अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हाश्मी, निवासी उपजिल्हाधिकारी हरीष धार्मिक, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, अधिष्ठाता डॉ. विनायक रुखमोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भूषणकुमार रामटेके, कार्यकारी अभियंता चव्हाण, गाणार, पठाण, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक निरज जागरे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त वाळके, जिल्हा नियोजन अधिकारी मृणालीनी भूत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शाम निमगडे, जिल्हा खनिकर्म अधिकारी गजभिये, जिल्हा उपनिबंधक कांबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदकिशोर नयनवाड, जिल्हा ग्रंथालय अधिकारी ढोणे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राठोड, जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी वासनिक, शिक्षणाधिकारी हिवरे, न.प.उपाध्यक्ष शिव शर्मा यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. फुके पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या ३४ हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून घेतला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ७७ हजार ४६४ खातेदार शेतकऱ्यांची २२३ कोटी रुपयांची कर्जमाफी झाली आहे. केंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान योजनेचा लाभ जिल्ह्यातील १ लाख २२ हजार १४२ शेतकºयांना देण्यात आला आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जसंधारण आणि मृदसंधारणामध्ये क्र ांती घडून आली आहे. या अभियानाला जिल्ह्यात लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाल्याने मागील चार वर्षात जिल्ह्यातील ३९९ गावात ८ हजार ९९२ कामे पूर्ण करण्यात आली. यामधून ८२ हजार ४९६ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला असून १ लाख ६४ हजार ९९३ हेक्टर क्षेत्र निर्माण झाले असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील शेतकºयांचे जीवनमान उंचावण्यासाठी मागील पाच वर्षात पुढाकार आला. जिल्ह्यातील विविध प्रकल्पातून १४ हजार ५६३ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. ११ हजार ८८४ शेतकºयांच्या कृषीपंपांना जुलै २०१९ पर्यंत वीजजोडणी दिल्यामुळे त्या शेतकºयांची शेती संरक्षित सिंचनाखाली आल्यामुळे उत्पादनात वाढ झाली आहे. डॉ. फुके पुढे म्हणाले, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून चार वर्षात जिल्ह्यातील ४३० कि.मी.ग्रामीण रस्त्यांची ८१ कामे पूर्ण करण्यात आल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना वाहतुकीची चांगली सुविधा निर्माण झाली आहे. जिल्हा हागणदारी मुक्त झाला असून नादुरुस्त असलेली ४१ हजार ७९७ शौचालय दुरुस्त करुन वापरात आणण्यात यश आले आहे.जिल्ह्यातील मजुरांचे कामानिमित्त होणारे स्थलांतर रोखण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना जिल्ह्यासाठी महत्वाची ठरली आहे. या योजनेतून पाच वर्षात ६ लाख ८९ हजार ७२९ कुटूंबाना रोजगार पुरविण्यात आल्याचे फुके यांनी सांगितले. प्रारंभी पालकमंत्र्यांनी ध्वजारोहण करुन परेडचे निरीक्षण केले व मानवंदना स्विकारली.कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार मंजूश्री देशपांडे यांनी मानले.पाच वर्षांत १७५९ कोटी रुपयांची धान खरेदीजिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार सक्षमपणे उभे आहे.मागील पाच वर्षात शासनाने १७५९ कोटी ९६ लाख रु पयांची धान खरेदी करुन ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली आहे. या धान उत्पादक शेतकऱ्यांना २१२ कोटी ६२ लाख रुपयांचे बोनस दिले आहे.१२ हजार हेक्टर वनक्षेत्र उपजीविकेसाठीवनहक्क कायदयाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून ८५६ सामूहीक वनहक्क दावे मान्य करु न ९८ हजार ५५५ हेक्टर तर ८ हजार ५०० वैयक्तिक दावेदारांना १२ हजार ६४ हेक्टर वनक्षेत्र त्यांच्या उपजिविकेसाठी वाटप करण्यात आले आहे. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा ५५६ शेतकºयांना लाभ दिला.५० कोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात १ कोटी ३९ लाख ९३ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली.पर्यटन स्थळांचा सर्वांगिन विकासगोंदिया जिल्हा हा नैसिर्गकदृष्टया समृध्द आहे. जिल्ह्यात पर्यटन स्थळे, तीर्थस्थळे, वन्यजीव व स्थलांतरीत पक्षी मोठया प्रमाणात आहे. जिल्ह्याचे वैभव असलेल्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पासोबतच जिल्ह्यातील अन्य पर्यटन स्थळांचा विकास करण्यासोबतच जास्तीत जास्त पर्यटक जिल्ह्यात कसे येतील व त्या माध्यमातून स्थानिकांना मोठया प्रमाणात रोजगार कसा उपलब्ध होईल. यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री फुके यांनी दिली.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनParinay Fukeपरिणय फुके