शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
3
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
4
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
5
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
6
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
7
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
8
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
9
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
10
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
11
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...
12
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
13
'वॉर २'च्या प्रमोशनवेळी ज्युनिअर एनटीआरचा पारा चढला, रागारागात चाहत्यांना दिली ताकीद
14
सावधान! बनावट नोटांचा सुळसुळाट! तुमच्या हातातली नोट खरी की खोटी, असे ओळखा!
15
DPL 2025 : "नायक नहीं खलनायक हूँ मैं..." या गोलंदाजानं हॅटट्रिक घेतली त्याच ओव्हरमध्ये मॅच घालवली
16
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
17
रशियन लोकांना तुर्की आवडत नाही? दोन वर्षांत तुर्कस्तानातील रशियन लोकसंख्या अर्ध्यावर!
18
हिमालयातलं पाणी बॉटलमधून विकतेय अभिनेत्री, एका बाटलीची किंमत वाचून झोप उडेल
19
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
20
नवऱ्याशी भांडल्यावर बायकोने दीड वर्षांच्या मुलाला दुसऱ्या मजल्यावरुन फेकलं, झाला मृत्यू

प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची समस्या मार्गी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 00:59 IST

चार प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांपैकी तीन प्रादेशिक पाणी पुरवठा योजना स्थानिक पाणी पुरवठा मंडळाच्या सहाय्याने चालविल्या जातात. त्यामध्ये मंडळांना योजना चालविताना अनेक समस्यांना समोरे जावे लागते. यासाठी या पाणी पुरवठा योजनांच्या समस्या मार्गी लावा.

ठळक मुद्देतरोणे यांचा पाठपुरावा : मुकाअंना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कबाराभाटी : चार प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांपैकी तीन प्रादेशिक पाणी पुरवठा योजना स्थानिक पाणी पुरवठा मंडळाच्या सहाय्याने चालविल्या जातात. त्यामध्ये मंडळांना योजना चालविताना अनेक समस्यांना समोरे जावे लागते. यासाठी या पाणी पुरवठा योजनांच्या समस्या मार्गी लावा.तालुक्यातील २००७-०८ मध्ये चारही प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचे बांधकाम पूर्ण होऊनही जिल्हा परिषदेला हस्तांतरीत न केल्यामुळे तत्कालीन सरपंचांनी एकत्र येऊन मंडळ स्थापन करुन योजना चालविण्यास सुरुवात केली. एकूण ५० गावांना मागील १० वर्षापासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा या योजना करीत आहेत. ४ वर्षापासून वाढलेले वीज बिल, मजुरी, योजना जुनी झाल्यामुळे देखभाल दुरुस्तीवर येणारा खर्च, मोटारपंप दुरुस्ती खर्च, रसायनाचे वाढलेले दर व इतर बाबींचा विचार करता पाणी पट्टीच्या मागणीतून योजनांची वार्षीक देखभाल दुरुस्ती करणे अशक्य झाले आहे. ३ वर्षापासून योजनांना देखभाल दुरुस्तीकरीता कुठलाही निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला नाही. त्यामुळे मंडळांना नळ धारकांकडून घेतलेली अनामत रक्कमही खर्च करावी लागली.रसायन खरेदीसाठी जिल्हा परिषदेकडे निधी उपलब्ध असूनही मागील १० वर्षात रसायनाचा पुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे रसायनांचाही भार मंडळांवर पडला. गाव स्तरावरील टाकीची दुरुस्ती, स्वच्छता व वितरण व्यवस्थेचे नियोजन करणे ग्रामपंचायतची जबाबदारी आहे. परंतु तालुक्यातील कोणत्याच ग्रामपंचायत मंडळांना सहकार्य करत नाही. वीज देयकाचे ५० टक्के अनुदान हे मागील २ वर्षापासून खूप उशीरा प्राप्त झाल्यामुळे व २०१७-१८ चे अनुदान अजूनपर्यंत प्राप्त न झाल्यामुळे वीज बिल थकीत होऊन अतिरीक्त दंड मंडळांना भरावा लागतो. चारही प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांवरील विद्युतीकरण व पंप व्यवस्था खुप जुन्या तंत्रज्ञानाची असल्यामुळे वीज बिलामध्ये ३० ते ४० टक्के अतिरीक्त भार मंडळावर पडत आहे. योजनेमध्ये काम करणारे मजुर यांना मजुरी मिळणे गरजेचे आहे. परंतु त्यांना मजुरी देण्यास मंडळ असमर्थ आहे. त्यामुळे काम करणाऱ्या मजुरांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठात शासकीय नियमानुसार मजुरी मिळण्यासाठी याचीका दाखल केली आहे. जलाशयातील पाणी उचल करण्याचे पाणी कर मंडळांना भरणा करणे कठीन जात आहे. तरी हे सुध्दा जिल्हा परिषदेने पाटबंधारे विभागाकडे जमा करावे.वरील समस्यांचे निराकरण केल्यास सदर योजना भविष्यात चालविणे शक्य होईल तरी सदर सर्व समस्यांची सोडवणूक करण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे यांनी केली असून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांना निवेदन दिले. निवेदन देताना जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर, निलकंठ बोरकर, कालीदास पुस्तोडे, रतीराम राणे, शारदा नाकाडे, लोकपाल गहाणे हे उपस्थित होते. 

टॅग्स :Waterपाणी