शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अटकेतील आरोपीच कोठडीतील मृत्यूचे ‘आय विटनेस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 05:00 IST

आमगाव येथील जिल्हा परिषद शाळेत चोरी केल्याच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चौघांना ताब्यात घेतले. त्यात एक अल्पवयीन बालक असल्याने राजकुमार अभयकुमार धोती (३०), सुरेश धनराज राऊत (३१) व राजकुमार गोपीचंद मरकाम (२२) या तिघांना अटक केली. त्यांना आमगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. परंतु कोठडीत असताना राजकुमार धोती (३०) याचा शनिवारी (दि.२२) पहाटे ५.१५ वाजता मृत्यू झाला.  

ठळक मुद्देपाठीवर आढळले व्रण : न्यायालयीन चौकशीची होत आहे मागणी

नरेश रहिलेलाेकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २० मे रोजी ताब्यात घेतलेल्या चोरीच्या प्रकरणातील तीन आरोपींपैकी एका आरोपीचा संशयास्पदरीत्या पोलीस कोठडीत मृत्यू झाला. या मृत्यूसंदर्भात मृताचे नातेवाईक पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप करीत आहेत. तर पोलीस हृदयविकाराने त्याचा मृत्यू झाला आहे हे सांगत आहेत. परंतु आमगावच्या पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या राजकुमार अभयकुमार धोतीचा (३०)  मृत्यू कशाने झाला याची साक्ष देणारे ‘आय विटनेस’ त्याच्या सोबत अटक झालेले दोन तरुण आहेत.आमगाव येथील जिल्हा परिषद शाळेत चोरी केल्याच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चौघांना ताब्यात घेतले. त्यात एक अल्पवयीन बालक असल्याने राजकुमार अभयकुमार धोती (३०), सुरेश धनराज राऊत (३१) व राजकुमार गोपीचंद मरकाम (२२) या तिघांना अटक केली. त्यांना आमगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. परंतु कोठडीत असताना राजकुमार धोती (३०) याचा शनिवारी (दि.२२) पहाटे ५.१५ वाजता मृत्यू झाला.  राजकुमार याला अटक केले तेव्हा त्याच्यासोबत सुरेश राऊत (३१) व राजकुमार मरकाम हे दोघेही अटकेत असल्याने ते तिघेही सोबतच होते. राजकुमार याच्यासोबत काय काय झाले. मारहाण झाली किंवा नाही याची माहिती देणारे हे दोघेही ‘आय विटनेस’ आहेत. त्यांना न्यायालयाने २३ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ते पोलीस कोठडीत सोबत असतानाच हा प्रकार घडल्याने राजकुमार धोतीचा मृत्यू नेमका कशाने झाला याची हे दोघेच साक्ष देतील. मात्र या घटने नंतर आमगाव शहरात पोलिसां विरोधात चांगलाच रोष दिसून आला. आता पुढे काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

न्यायालयीन चौकशीची होतेय मागणीपोलीस कोठडीत मृत्यू झाल्यास त्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून करण्यात येतो. परंतु या प्रकरणाची चौकशी न्यायालयीन प्रक्रियेतून व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. न्यायालयीन चौकशीतून सत्यता पुढे येईल. पोलीस कोठडीत झालेला चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीचा मृत्यू नेमका कशाने हे विसेरा अहवाल सांगेल. परंतु या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाल्यास ‘दूध का दूध और पानी का पानी होईल’ असेच म्हटले जात आहे.

शरीरावरचे व्रण काय सांगून जातात?राजकुमार धोती याच्या शरीरावर व्रण असल्याचा फोटो नातेवाईक व समाजमाध्यमांनी काढला. त्याच्या शरीरावर व्रण व जखमा असल्याने त्याला मारहाण तर झाली नाही. मारहाण झाली तर त्याचे साक्षीदार अटक असलेले सुरेश राऊत (३१) व राजकुमार मरकाम हे दोन आरोपी आहेत. परंतु ते सध्या कोठडीत असतांना त्यांच्यावर पोलिसांचा दबाव असू नये म्हणून आता त्यांचे बयान घेऊ नये. ते सुटून घरी परतल्यावर त्यांचे बयान नोंदवायला पाहिजे, असाच सूर घटनास्थळावर उमटत होता. दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायेथील पोलीस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी बेदम मारहाण केल्यामुळेच पोलीस ठाण्यात आरोपी असलेल्या तरुणाचा मृत्यू झाला. त्याला मारहाण करणाऱ्या पोलिसांना निलंबित करून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आमगाव- देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसरम कोरोटे यांनी केली आहे. मृताच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार कोरोटे सकाळपासून ठाम मांडून होते. पोलीस ठाण्यात शेकडो नागरिकांनी मृताला न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांविरोधात नारेबाजी केली. मृत राजकुमार अभयकुमार याला बेदम मारहाण झाल्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप आ. कोरोटे यांनी केला आहे. मृत तरुण मजुरीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता.  कुटुंबात एकटा असल्याने कुटुंबाचा आधार हिरावला.  मृताच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा, अशी मागणी आ. कोरोटे, म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्वरी, संजय बहेकार, महेश उके, मुन्ना गवळी यांनी केली आहे.पोलीस निरीक्षकासह चौघे जण निलंबित राजकुमार धोती याच्या मृत्यू प्रकरणात आमगाव पोलीस ठाण्यातील दोन अधिकारी व दोन कर्मचाऱ्यांना कारणीभूत ठरवून पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये आमगावचे ठाणेदार सुभाष चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक महावीर जाधव, ठाणेदारांचा वाहन चालक पोलीस हवालदार खेमराज खोब्रागडे (ब.क्र.१०१४) व पोलीस शिपाई अरुण उईके (ब. क्र. १८७७) यांचा समावेश आहे. या चौघांना पोलीस मुख्यालयात संलग्न करण्यात आले आहे. आमगाव पोलिसांनी पोलिसांची प्रतिमा मलीन करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कृत्य केले. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम २५ व महाराष्ट्र पोलीस शिक्षा व अपील अधिनयम १९५६ मधील नियम ३ च्या पोटनियम (१-अ) (एक) (ब) अन्वये पोलीस अधीक्षकांनी चौघांना निलंबित केले आहे.

 

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेDeathमृत्यू