शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
2
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
3
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
4
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
5
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
6
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
7
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
8
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
9
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
10
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
11
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
12
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
13
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
14
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
15
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
16
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
17
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
18
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
19
सामुद्रिक शास्त्र: शरीराच्या कुठल्या भागावर 'तिळ' आहे, त्यानुसार समुद्र शास्त्र सांगते तुमचे भाकीत!
20
​​​​​​​Kotak Mahindra Bank Success Story: २ खोल्यांपासून झाली सुरुवात, आज ४ लाख कोटींचा टर्नओव्हर; वाचा कोटक महिंद्रा बँकेची अनटोल्ड स्टोरी
Daily Top 2Weekly Top 5

परराज्यातून येणाऱ्यांची सखोल चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 05:00 IST

पालकमंत्री देशमुख म्हणाले, पूर्वी शहरी भागात असलेला हा संसर्ग आता या व्यक्तींमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा वगळून कोणतीही सवलत देण्यात येणार नाही. कंटेन्मेंट झोन व इतर आवश्यक ठिकाणी पोलीस विभागाने चोख बंदोबस्त ठेवावा.

ठळक मुद्देअनिल देशमुख : कोरोना स्थितीबाबत घेतला आढावा, आरोग्य व पोलीस विभागाला दिले निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात बाहेरुन येणाऱ्यांमुळे कोरोनाचा शिरकाव झाला. त्यामुळे खबरदारीचा उपाय आणि कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी बाहेरील राज्य आणि जिल्ह्यातून येणाºया नागरिकांची सखोल चौकशी करा. त्यांची आरोग्य तपासणी करण्यात यावी, यासाठी आरोग्य आणि पोलीस विभागाने विशेष काळजी घ्यावी असे निर्देश राज्याचे गृहमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल देशमुख यांनी आज (दि.३) येथे दिले.जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात बुधवारी (दि.३) जिल्ह्यात कोरोना संसर्गाने उद्भवलेल्या परिस्थिती आणि कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी अधिकाऱ्यांना निर्देश देताना ते बोलत होते. बैठकीला आ. मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे व अपर जिल्हाधिकारी राजेश खवले उपस्थित होते.पालकमंत्री देशमुख म्हणाले, पूर्वी शहरी भागात असलेला हा संसर्ग आता या व्यक्तींमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा वगळून कोणतीही सवलत देण्यात येणार नाही. कंटेन्मेंट झोन व इतर आवश्यक ठिकाणी पोलीस विभागाने चोख बंदोबस्त ठेवावा. नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये.अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडावे. बाहेर पडताना सुरक्षित शारीरिक अंतर ठेवावे. नाक व तोंडाला मास्क लावावा. विषाणू नमुने तपासणीसाठी गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लवकरच चाचणी प्रयोगशाळा सुरू होणार असल्याचे पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले.गर्भवती महिलांची नियमित आरोग्य तपासणीकोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून क्षयरुग्ण व उच्च रक्तदाब रुग्णांची आणि गर्भवती महिलांची नियमित तपासणी करण्यात येत असल्याची माहिती डॉ.बलकवडे यांनी या वेळी दिली. बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. विनायक रुखमोडे, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. हिंमत मेश्राम, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, राहुल खांडेभराड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मंगेश वानखेडे यांची उपस्थिती होती.४४ हजार नागरिक परराज्य आणि जिल्ह्यातून दाखलबाहेर जिल्ह्यातून आणि परराज्यातून जिल्ह्यात आतापर्यंत ४४ हजार नागरिक दाखल झाले आहेत. जिल्ह्यात सध्या स्थितीत १९ कोरोना क्रि याशील रुग्ण आहे. २३ कंटेन्मेंट झोन असून यामध्ये शहरी भागात तीन आणि ग्रामीण भागात वीस कंटेन्मेंट झोनचा समावेश आहे. जिल्ह्यातील ४८ व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे. संस्थात्मक अलगीकरणात ३२०५ तर गृह अलगीकरणात २७०७ व्यक्ती आहेत. जिल्ह्यात १२ कोविड केअर सेंटर असून त्याची खाटांची क्षमता १२८६ इतकी आहे. सद्यस्थितीत या सेंटरमध्ये ३३७ व्यक्ती उपचार घेत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAnil Deshmukhअनिल देशमुख