शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

कृषी विभाग ॲक्शन मोडवर, पाच कृषी केंद्राचे परवाने निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:28 IST

गोंदिया : जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात खताचा पुरवठा केल्यानंतरही काही विक्रेते कृत्रिम टंचाई निर्माण करून, अधिक दराने खताची विक्री करीत ...

गोंदिया : जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात खताचा पुरवठा केल्यानंतरही काही विक्रेते कृत्रिम टंचाई निर्माण करून, अधिक दराने खताची विक्री करीत होते. ‘लोकमत’ने हा मुद्दा लावून धरल्यानंतर कृषी विभागाने याची दखल घेत, पॉस प्रणालीवर विक्री न करता ऑफलाइन खताची विक्री करणाऱ्या जिल्ह्यातील पाच कृषी केंद्राचे परवाने सहा महिन्यांसाठी निलंबित केले आहे.

सहा महिन्यांसाठी परवाने निलंबित केलेल्यांमध्ये मे.कास्तकार कृषी केंद्र नवेगाव धापेवाडा, मे.गुगल ट्रेडर्स परसवाडा, मे.हिमालय ॲग्रो इंटरप्रायजेस गोरेगाव, मे.शेतकरी कृषी केंद्र सडक अर्जुनी, मे.तिरुपती कृषी सेवा केंद्र डव्वा या कृषी केंद्राचा समावेश आहे. रासायनिक खत विक्री करताना ती ऑनलाइन पद्धतीने पॉस प्रणालीवर (पीओएस) करण्याबाबत केंद्र शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार, कृषी विभागामार्फत विक्रेत्यांना वेळोवेळी सूचना दिल्या. ऑफलाइन पद्धतीने विक्री केल्यामुळे जिल्ह्यात खताची उपलब्धता असल्याबाबत चुकीची माहिती खत प्रणालीवर दिसते. त्यामुळे जिल्ह्यास रासायनिक खताचा कमी पुरवठा होऊन टंचाईची परिस्थिती निर्माण होते. जिल्ह्यातील काही विक्रेत्यांनी ऑफलाइन पद्धतीने रासायनिक खताची मोठ्या प्रमाणात विक्री केल्याचे आढळले. त्यामुळे त्यांना नोटीस देऊन खुलासा मागितला. त्यांनी दिलेले खुलासे समाधानकारक नसल्यामुळे त्यांचे रासायनिक खत विक्री परवाने ६ महिन्यांसाठी निलंबित केले आहेत.

..........

सीमेवरील खत विक्रेत्यांची चौकशी सुरू

महाराष्ट्रातील युरिया खताची लगतच्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यात अधिक दराने विक्री करणाऱ्या आमगाव, सालेकसा, देवरी या तिन्ही तालुक्यांतील काही खत विक्रेत्यांची कृषी विभागाने चौकशी सुरू केली आहे. स्टॉक बुकनुसार स्टॉक आहे किंवा याचीही चाचपणी सुरू केल्याची माहिती आहे.

.................

लिंकिंगचा भुर्दंड शेतकऱ्यांना

काही खत विक्रेत्या कंपन्या वितरकांना युरियाचा पुरवठा करताना, त्यासोबत संयुक्त खते घेण्याची सक्ती करीत आहेत. यामुळे कृषी केंद्र संचालक ते शेतकऱ्यांच्या माथी मारत आहे. २६८ रुपयांची युरियाची बॅग खरेदी करण्यासाठी १,१५० रुपयांची संयुक्त खताची खरेदी करावी लागत आहे.

...........

जिल्ह्यातील खत विक्रेत्यांंनी रासायनिक खताची विक्री केवळ ऑनलाइन पद्धतीने पॉस प्रणालीवर करावी. खताची साठेबाजी, काळाबाजार, लिंकिंग इत्यादी गैरव्यवहार निदर्शनास आल्यास संबंधित कृषी केंद्रावर कडक कारवाई करण्यात येईल.

- गणेश घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.