रावण मैदानात ठेवलेल्या चारचाकी वाहनांची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:25 AM2021-07-25T04:25:13+5:302021-07-25T04:25:13+5:30

शास्त्री वॉर्डातील महिलेला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी गोंदिया : शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या शास्त्री चौक छोटा गोंदिया येथील ...

Demolition of four-wheelers parked at Ravana Maidan | रावण मैदानात ठेवलेल्या चारचाकी वाहनांची तोडफोड

रावण मैदानात ठेवलेल्या चारचाकी वाहनांची तोडफोड

Next

शास्त्री वॉर्डातील महिलेला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी

गोंदिया : शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या शास्त्री चौक छोटा गोंदिया येथील किसना सतेन्‍द्र बिसेन (३५) या महिलेला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना २४ जुलै रोजी सकाळी ८ वाजता घडली. आरोपी दुर्गेश मोहनलाल बिसेन (४५) याने घर माझ्या नावावर करून दे म्हणून किसना यांच्यासोबत वाद घातला. हे घर माझ्या सासूच्या नावाने आहे असे किसना यांनी म्हटले असता त्यांना शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. तक्रारीवरून शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

तरुणाला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी

गोंदिया : शहर पोलीस ठाण्यांतर्गत मरघटरोड पैकनटोली येथील मोहन किशोर नखाते (२२) या तरुणाला आरोपी संजय भेलावे (४०, रा. मढी चौक) याने तुझ्या गाडीमुळे माझ्या घराच्या काड्यांचे कुंपण तुटले असा आरोप करीत त्यांना शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली. तक्रारीवरून शहर पोलिसांनी २४ जुलै रोजी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पत्नीला दिली पेट्रोल टाकून जाळून घेण्याची धमकी

गोंदिया : शहराच्या गौतमनगरातील अमर मेश्राम (२०) याने आपल्या पत्नीला तू माझ्या घरी न परतल्यास मी स्वतः पेट्रोल अंगावर टाकून जाळून घेईन अशी धमकी दिली. ही घटना २३ जुलै रोजी रात्री सायंकाळी ७ वाजता घडली. अमर नेहमी दारू पिऊन पत्नीला शिवीगाळ करीत होता. त्यामुळे पत्नी प्रज्ञा अमर मेश्राम (२०) ही २३ जुलै रोजी माहेरी गेली. यावर अमर दारू पिऊन सासुरवाडीत गेला व तेथे त्याने आपल्या पत्नीला माझ्यासोबत घरी चल आणि तू येत नसशील तर मी माझ्या अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला जाळून टाकतो, अशी धमकी दिली. या घटनेची तक्रार प्रज्ञा मेश्राम यांनी शहर पोलिसात दिली असून आरोपीविरुद्ध पोलिसांनी भादंवि कलम ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

त्या अपघातातील जखमीचा मृत्यू

गोंदिया : गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत सेजगाव येथील कुसुम कन्हैयालाल सोनवणे (६५) यांचा उपचार घेताना येथील वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. १९ जून रोजी लोहालाईन परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. यावर त्यांना उपचारासाठी येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. शहर पोलिसांनी २४ जुलै रोजी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध भादंवि कलम ३०४, ३३८,२७९ सहकलम १८४, १३४ मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Demolition of four-wheelers parked at Ravana Maidan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.