शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

ग्रा.पं.कर्मचाऱ्यांची वेतनवाढीची मागणी मार्गी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 05:00 IST

या वेळी दिलेल्या निवेदनातून राज्यातील २७ हजार ९२० ग्रामपंचायतीमध्ये काम करित असलेल्या ६० हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न मागील ६० वर्षांपासून प्रलंबित आहे. याबाबत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी १० जुलै २०१८ रोजी नागपूर अधिवेशन काळात खापरी ते विधानभवन लाँग मार्च ३५ ते ४० हजार कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत काढला होता.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनद्वारे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी व निवृत्ती वेतनश्रेणीमध्ये वाढ व इतर मागण्याकरिता युनियनचे अध्यक्ष धनराज तुमसरे, सचिव छगनलाल अग्रेल यांच्या नेतृत्त्वात जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांना निवेदन देण्यात आले.या वेळी दिलेल्या निवेदनातून राज्यातील २७ हजार ९२० ग्रामपंचायतीमध्ये काम करित असलेल्या ६० हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न मागील ६० वर्षांपासून प्रलंबित आहे. याबाबत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी १० जुलै २०१८ रोजी नागपूर अधिवेशन काळात खापरी ते विधानभवन लाँग मार्च ३५ ते ४० हजार कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत काढला होता. त्यावेळी तत्कालीन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भूसे यांनी मांगण्या मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच ७ जानेवारी २०१९ ला लातूर येथील अधिवेशनात ग्रामविकास मंत्री व कामगार मंत्री यांनी मांगण्या मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते.परंतु या मागण्या अद्यापही मंजूर करण्यात आल्या नाही. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात यावे, निवृत्तीवेतन पेन्शन लागू करण्यात यावे, उपदान लागू करण्यात यावे, भविष्य निर्वाह निधीची रक्कम कामगार भविष्य निर्वाह निधी संघटन ईपीएफ या कार्यालयात जमा करण्यात यावे, कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतन लागू करण्यात यावे, ग्रामपंचायत कर्मचाºयांच्या वेतनासाठी लाददेली वसुलीची अट रद्द करण्यात यावी. आकृतीबंधात सुधारणा करण्यात यावी. आदि मांगण्याचा समावेश होता.शिष्टमंडळात कार्याध्यक्ष माधव सेऊतकर, मुन्ना मेश्राम, सुनील भेलावे, मनोहर मेश्राम, प्रकाश रंगारी, नरेंद्र टेंभूरकर, तारा परसमोडे, देवेंद्र यावलकर, धर्मराज काळसर्पे, लोमेश गहाणे, देवेद्र शेंडे, भोजराज गिऱ्हेपूंजे, विठ्ठल शहारे, उमेश्वर पटले, सुरेश शहारे, श्रीपत धानगुप्ता, उमेंद्र चवरे, अंगद नागपुरे, रविंद्र मिसार, सुनील शहारे,पवन जांभूळकर, मिताराम पालेवार, लक्ष्मीचंद कटरे, रविशंकर टेंभरे, मच्छिंद्र उजवने यांचा समावेश होता.

टॅग्स :Employeeकर्मचारी