शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

गोरेगावच्या शेवाळाला राष्ट्रीयस्तरावर मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 00:52 IST

गोंदिया हा तलावाचा जिल्हा अशी सर्वदूर ओळख असतांना या जिल्ह्यातील तलाव बोडीतील नैसर्गिक साधन संपत्तीचा कधीही अभ्यास झाला नाही. नागपूरहून आलेल्या तज्ञांनी येथील चंभार बोडी (तलाव) चा अभ्यास केल्यानंतर जे वास्तव पुढे आले ते कुतुहलाचा विषय ठरत आहे.

ठळक मुद्देबोडीत हिरवे पाणी : उत्पन्न वाढविण्यास होणार मदत, न.प. करणार स्वच्छता

दिलीप चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : गोंदिया हा तलावाचा जिल्हा अशी सर्वदूर ओळख असतांना या जिल्ह्यातील तलाव बोडीतील नैसर्गिक साधन संपत्तीचा कधीही अभ्यास झाला नाही. नागपूरहून आलेल्या तज्ञांनी येथील चंभार बोडी (तलाव) चा अभ्यास केल्यानंतर जे वास्तव पुढे आले ते कुतुहलाचा विषय ठरत आहे. चंभार बोडीतील शेवाळची देशातच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावर असल्याची बाब पुढे आली आहे.प्राप्त माहितीनुसार गोरेगाव शहराच्या मध्यभागी चंभार बोडी (तलाव) अनेक वर्षांपासून आहे. या तलावातील पाणी हिरव्या रंगाचे आहे. त्या पाण्यातील शेवाळाची लाखाच्या घरात मागणी आहे. या शेवाळापासून लहान मुलांसाठी प्रोटीनयुक्त पदार्थ, जिम पावडर, फुड स्पेशलिस्ट असे पदार्थ जे शरीरष्ठीला फायद्याचे आहे. ते सर्व या चंभार बोडीतील शेवाळपासून बनतात असे बोडीची पाहणीसाठी आलेल्या तज्ञाचे म्हणणे आहे. चंभार बोडीत नैसर्गिकरित्या हे महाग शेवाळ उपलब्ध होत असल्यामुळे स्थानिक नगर पंचायतीला याचा मोठा आर्थिक लाभ होणार आहे. सदर शेवाळ सहजासहजी तयार होत नाही तर त्यासाठी तशी प्रक्रिया बऱ्याच जागी करावी लागते. कृत्रिमरित्या शेवाळ तयार केले जाते. नंतर ते बाजारात प्रोट्रीन म्हणून विकले जाते. दहा ग्राम शेवाळच्या पावडरची मागणी बाजारात एक हजार रुपये आहे. ७ फेब्रुवारीला नागपूरहून आलेल्या बायोकेअर कंपनीच्या टिमने गोरेगाव येथील चंभार बोडीची पाहणी केली. त्यांनी बोडीत नाव फिरवून पाण्याचे निरीक्षण केले. बोडीतील पाच जागेवर मायक्रो आॅरगानिझम टाकले. यामुळे दूषित बोडीतील पाणी शुध्द होणार आहे. घरातील सांडपाणी बोडीत येत असल्यामुळे पाणी दूषित झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी नगरपंचायतचे नगराध्यक्ष आशिष बारेवार यांनी चंभार बोडीच्या शुध्दीकरणाचा प्रस्ताव लवकरच प्रस्तावित करणार असल्याचे लोकमतशी बोलताना सांगितले.दूषित पाण्यामुळे माशांना धोकाचंभार बोडीत आजघडीला विविध जातीची सात ते आठ हजार मासे आहेत. पण या माशांना दूषित पाण्यामुळे आॅक्सिजन व सूर्यप्रकाश मिळत नाही. अनेक मासे दरवर्षी मरत असल्याचे चित्र आहे. या बोडीत राहु, कतला, सिपनस अशी महागड्या मासे आहेत. या बोडीतील हिरवे पाणी माशांसाठी धोकादायक ठरत आहे.कसे तयार होते प्रोटीन?शेवाळपासून प्रोटीन तयार करण्यासाठी प्रथम जाळीतून शेवाळ काढावे लागते.या शेवाळपासून उच्च दर्जाचे प्रोटीन निघाल्यावर ते सोलर कुकरमध्ये टाकून पावडर काढले जाईल. त्यानंतर प्रोसेसिंग करुन त्याची विक्री केली जाते. सदर प्रोटीनची विदेशात मोठी मागणी आहे.विविध कराच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाशिवाय नगरपंचायतला दुसरे उत्पन्न नाही. शेवाळचे पावडर बनवून त्यांची विक्री केल्यास नगर परिषदेला उत्पन्न मिळेल.- हर्षीला राणे, मुख्याधिकारी न.प.गोरेगावगोंदिया जिल्ह्यात बरीच साधन सामग्री आहे. त्याविषयी अभ्यास होणे गरजेचे आहे. चंभार बोडीतील शेवाळमुळे गोरेगाव न.प.ला उत्पन्न मिळणार आहे. येथील नागरिकांसाठी रोजगाराच्या संधीही निर्माण होतील.अजुनही जिल्ह्यात असे बरेच तलाव असू शकतात त्यांची खातरजमा झाली पाहिजे.-आशिष बारेवार, नगराध्यक्ष, नगरपंचायत गोरेगाव.