शहरं
Join us  
Trending Stories
1
Gen Z आंदोलनाचा उडाला भडका, आणखी एका देशात सत्तांतर; कर्नल बनले राष्ट्रपती, लष्कर चालवणार देश
2
आसाममधील तिनसुकिया येथील लष्करी छावणीवर दहशतवादी हल्ला, तीन जवान गंभीर जखमी
3
टाटा कंपनीचा 'हा' स्टॉक झुनझुनवाला कुटुंबासाठी ठरला मल्टीबॅगर; एका दिवसात ४०० कोटींचा नफा
4
नितीश कुमार 25 तर भाजप..; बिहार निवडणुकीत कोण किती जागा जिंकेल? प्रशांत किशोर म्हणाले...
5
Rahul Gandhi : राहुल गांधी पोहोचले हरिओम वाल्मिकी यांच्या घरी, कुटुंबाने भेटायला दिला होता नकार; नेमकं प्रकरण काय?
6
गुरुद्वादशी २०२५: श्रीपाद श्रीवल्लभ यांचा स्मरण दिन; ३० वर्षांचे अद्भूत अवतार कार्य! वाचा
7
भारताच्या इशाऱ्यावर तालिबाननं केला हल्ला, पाक पंतप्रधानांचा दावा; "जर युद्ध झालं तर..."
8
Diwali Muhurat Trading 2025 : शेअर बाजारात कधी होणार मुहूर्त ट्रेडिंग, १ तासासाठी उघडणार मार्केट; वेळ लिहून ठेवा, यावेळी झालाय बदल
9
Nissan Magnite CNG : पेट्रोल दरवाढीला 'बाय बाय'! निसानची कार ऑटोमॅटिक गियरबॉक्ससह लाँच; किंमत ऐकून खूश व्हाल
10
IRCTC Website Down: आयआरसीटीसीची तिकीट बुकिंग साईट झाली ठप्प! मोबाईल अ‍ॅपवरुनही बुकिंग होईना
11
Shivajirao Kardile: भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
12
Diwali 2025: अश्विन वद्य द्वादशीलाच वसुबारस का? कोणत्या गायीला हा सण समर्पित आहे माहितीय?
13
वयाच्या २५ व्या वर्षी ऑलिंपिक चॅम्पियननं घेतला संन्यास; एरियार्नच्या निर्णयानं चाहते हैराण
14
दिवाळीत शनि प्रदोष: शंकराची पूजा देईल पुण्य-लाभ, ‘असे’ करा व्रत; प्रभावी मंत्रांचे जप कराच
15
सोनं-चांदी विक्रमी स्तरावर! एका वर्षात चांदी ९०% तर सोनं ६५% वधारलं; का वाढली इतकी मागणी?
16
त्रिग्रही योग: ९ राशींची संक्रांत संपेल, १ महिना फक्त लाभ; रोज १ उपायाने भाग्योदय, मंगल काळ!
17
पत्नीसोबत मिळून करा 'इतकी' गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹६१६७ चं फिक्स व्याज; जबरदस्त आहे पोस्टाची 'ही' स्कीम
18
"कठीण काळ सुरु आहे, पण हा शेवट नाही..." अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, नाम याद रखना!
19
'कर्मचारी कमी नको, जास्त हवेत!' ट्रम्प यांच्या व्हिसा धोरणाविरोधात अमेरिकेतील कंपन्या आक्रमक, कायदेशीर संघर्षाला सुरुवात
20
भारताच्या 'मेक इन इंडिया' धोरणाची चीनला भीती; म्हणतात आमची कॉपी केली! नेमकं प्रकरण काय?

अग्निशमन विभागाची ६७ पदांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 21:15 IST

आणीबाणीच्या स्थितीत महत्त्वाची भूमिका बजाविणाºया येथील अग्निशमन विभागाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. पदे रिक्त असल्यामुळे विभागाने आणखी ६७ पदांची मागणी केली असून तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.

ठळक मुद्देविभागाला रिक्त पदांचे ग्रहण : शासनाकडे पाठविला सुधारित प्रस्ताव, रिक्त पदांमुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर ताण

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आणीबाणीच्या स्थितीत महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या येथील अग्निशमन विभागाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. पदे रिक्त असल्यामुळे विभागाने आणखी ६७ पदांची मागणी केली असून तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. रिक्त पदांमुळे मात्र विभागाच्या सेवेवर परिणाम पडत असून शिवाय याचा ताण कार्यरत कर्मचाऱ्यांवर येत आहे.कोठेही आग लागल्याची घटना घडल्यास सर्वप्रथम आठवण येते ती अग्निशमन वाहनाची. शिवाय आणिबाणीच्या परिस्थितीतही अग्निशमन विभाग धावून येतो. यावरून अग्निशमन विभागाचे महत्व लक्षात येते. म्हणूनच अग्निशमन विभागाला पाहिजे त्या सुविधा पुरविणे हे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे. अग्निशमन विभाग परिपूर्ण असल्यास त्याचा फायदा जनतेलाच मिळतो. मात्र खेदाची बाब अशी की, येथील अग्निशमन विभागाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. विभागातील काही मुख्य पदांचाच विचार केल्यास तिही पूर्णपणे भरलेली नसल्याचे दिसत आहे.विभागातील या रिक्त पदांमुळे एकतर सेवेवर परिणाम पडतो. शिवाय विभागात कार्यरत कर्मचाºयांवर याचा ताण पडत आहे. विशेष म्हणजे, शासनाने अग्निशमन विभागासाठी २५ पदे मंजूर केल्याची माहिती आहे. त्यानुसार, येथील अग्निशमन विभागाकडून पदनिहाय किती कर्मचारी लागतील याचा प्रस्तावच शासनाला पाठविण्यात आला होता. मात्र त्यानंतर शासनाकडून सुधारीत प्रस्ताव मागविण्यात आला. त्यात अग्निशमन विभागाने तीन पाळ््यांना घेत ६७ पदांची मागणी केली आहे.अशी केली पदांची मागणीअग्निशमन विभागाकडे सध्या प्रमुख अग्निशामकाची (लिडींग फायरमन) दोन पदे मंजूर असून तेथे १० पदांची, वाहन चालक-पंप आॅपरेटरची चार पदे मंजूर असून तेथे ११ पदांची तर अग्निशामकची (फायरमन) ६ पदे मंजूर असून तेथे ४६ पदांच्या म्हणजेच एकूण ६७ पदांच्या निर्मितीची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, अग्निशमन विभागातील या मंजूर पदांमधीलही काही पदे रिक्त पडून आहेत. अशात विभागात सध्या कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे.अशी आहेत रिक्त पदेअग्निशमन विभागातील मुख्य काही पदांचीच पाहणी केल्यास आजघडीला लिडींग फायरमनची दोन पदे मंजूर असून त्यातील एक पद रिक्त आहे. वाहन चालक-आॅपरेटरची चार पदे मंजूर असून त्यातील दोन पदे रिक्त आहेत. फायरमनची सहा पदे रिक्त असून एक पद रिक्त आहे. अशाप्रकारे १२ पैकी चार पदे रिक्त आहे. त्यामुळे विभागात सध्या ७ वाहनचालक कंत्राटी तत्वावर कार्यरत असून १२ फायरमन रोजंदारीने काम करीत आहेत.५ वर्षांपासून अग्निशमन अधिकाऱ्यांचे पद रिक्तसुमारे पाच वर्षांपासून येथील अग्निशमन अधिकाऱ्यांचे पद रिक्त पडून आहे. त्यामुळे येथील लिडींग फायरमनकडे प्रभार दिला जात असल्याची परंपरा सुरू आहे. सध्या लिडींग फायरमन छबीलाल पटले यांच्याकडे अग्निशमन अधिकाऱ्यांचा प्रभार देण्यात आला आहे. याशिवाय अग्निशमन सह अधिकाऱ्यांचेही पद मागील १० वर्षांपासून रिक्त पडून असल्याची माहिती आहे. विभागातील अशी महत्वाची पदे रिक्त पडलेली असून जिल्हा व नगर परिषद प्रशासनाचे कार्य किती सुरळीतपणे सुरू आहे याची प्रचिती येते.