शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माहेरघरात होतात प्रसूती ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:33 IST

संतोष बुकावन अर्जुनी मोरगाव : सारा देश कोरोनाने हादरला. फाटलेल्या आरोग्य यंत्रणेचे पितळ उघडे पडले. कोरोना काळात अनेक सुधारणा ...

संतोष बुकावन

अर्जुनी मोरगाव : सारा देश कोरोनाने हादरला. फाटलेल्या आरोग्य यंत्रणेचे पितळ उघडे पडले. कोरोना काळात अनेक सुधारणा झाल्या; मात्र केशोरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूती, शल्यक्रिया, ओपीडी कक्ष व कर्मचारी वसाहत जीर्णावस्थेत आहेत. रुग्णालयाची इमारत केव्हा होणार, असा प्रश्न केशोरीवासीय विचारत आहेत.

केशोरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम १९७८ ला झाले. येथील डॉक्टर व कर्मचारी मेहनती आहेत. मात्र भौतिक सुविधांचा अभाव असल्याचे दिसून येते. क्षेत्रफळाच्या बाबतीत आरोग्य केंद्राचे क्षेत्र विस्तीर्ण आहे. या केंद्रात ११ ग्रामपंचायत, ६ प्रा.आ. उपकेंद्र आहेत. ४४ गावे व २६ हजार लोकसंख्येसाठी हे रुग्णालय आहे. सुलभ प्रसूतीसाठी प्रसिद्ध असलेले हे आरोग्य केंद्र भौतिक सुविधांच्या अभावामुळे थिटे पडले आहे. येथे पाण्याची सुविधा नाही. पाण्याच्या कॅन विकत घेतल्या जातात. याच पाण्याचा वापर सर्व कामांसाठी केला जातो. प्रसूतिगृह, शल्यक्रिया कक्ष, ओपीडी खोली जीर्ण झाली आहे. कर्मचाऱ्यांसाठी वसाहत आहे खरी, मात्र ती अत्यंत जीर्ण झाल्यामुळे कर्मचारी राहण्यास तयार नाहीत. केवळ दोन कर्मचारी येथे वास्तव्यास आहेत. उर्वरित क्वार्टर रिकामे पडले आहेत. प्रसूतिगृहातील छत कोसळले आहे. गटार पूर्ण भरल्यानंतर गटारातून परत पाणी खोलीत शिरते.

......

टाकीचे झाकण उघडेच

शल्यक्रिया कक्षाच्या बाजूला शौचालय आहे. शौचालयाचे झाकण तुटले आहे. ते सताड उघडे पडले आहे. रात्रीच्या वेळी चुकून एखादा रुग्ण गेला की तो थेट शौचालयाच्या टाकीत जाईल, हे केव्हाही जीवघेणे ठरू शकते. रुग्णालयातील इलेक्ट्रिक फिटिंग बांधकामाच्या वेळी झाली आहे. काही ठिकाणी ती सताड उघडी आहे. एकप्रकारे हे अपघाताला निमंत्रण देण्यासारखे आहे. येथे कर्मचाऱ्यांचा सुद्धा अनुशेष आहे. सद्यस्थितीत केवळ ६० टक्के कर्मचारी कार्यरत आहेत.

............

ग्रामीण रुग्णालयाची मागणी

केशोरी हा आदिवासी व दुर्गम परिसर आहे. २० कि.मी. अंतरावर अर्जुनी मोरगाव येथे ग्रामीण रुग्णालयाची सुविधा आहे. केशोरीपासून शेवटचे गाव २० कि.मी.वर आहे. खडकी, बोरटोला, तिरखुरी, नागनडोह येथील रुग्णाला ग्रामीण रुग्णालयात न्यायचे झाल्यास ४० कि.मी.चा प्रवास करावा लागतो. रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. अशा परिस्थितीत रुग्णाचे बरे-वाईट होऊ शकते. त्यामुळे केशोरी येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्यात यावे, अशी परिसरातील ग्रामस्थांची मागणी आहे.

...............

प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत ४० ते ४५ वर्षे जुनी आहे. डागडुजीसंदर्भात वरिष्ठांना माहिती देण्यात आली आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. आमचा पाठपुरावा सुरू आहे. कोरोना आटोक्यात आल्यानंतर डागडुजी केली जाईल, असे वरिष्ठांनी सांगितले आहे. सध्या आम्ही प्रसूतीची व्यवस्था माहेरघरात केलेली आहे. या ठिकाणी उपचार शक्य झालेच नाही तेव्हाच रुग्णांना बाहेर पाठविले जाते.

- डॉ. पिंकू मंडल, वैद्यकीय अधिकारी केशोरी

230821\img-20210817-wa0024.jpg

प्रा आ केंद्रातील शौचालयाचा जीवघेणा खड्डा