शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
2
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
3
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
4
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
6
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
7
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
8
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
9
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
10
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
11
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
12
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
13
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
14
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
15
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
16
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
17
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
18
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
19
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
20
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका

संततधार नंतरही तूट कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 05:00 IST

पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले व प्रकल्पांना पाणी आले असून जिल्हा पाणीदार झाला आहे. असे असतानाच मात्र अद्याप जिल्ह्यात पावसाची तूट कायम आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ९११.३ सरसरी पाऊस अपेक्षित असतानाच ६३५.७५ सरासरी पाऊस पडला आहे. म्हणजेच, आजही २७५.५६ सरासरीची तूट कायम असून पावसाची गरज आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात पावसाची गरज : २७५.५६ सरासरीची तूट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील आठवड्याभरापासून संततधार बरसत असलेल्या पावसाने अवघ्या जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले व प्रकल्पांना पाणी आले असून जिल्हा पाणीदार झाला आहे. असे असतानाच मात्र अद्याप जिल्ह्यात पावसाची तूट कायम आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ९११.३ सरसरी पाऊस अपेक्षित असतानाच ६३५.७५ सरासरी पाऊस पडला आहे. म्हणजेच, आजही २७५.५६ सरासरीची तूट कायम असून पावसाची गरज आहे.जिल्ह्यात जून व जुलै या सुरूवातीच्या २ महिन्यांत थोडाफार पाऊस बरसला व तेव्हापासूनच पावसाची तूट दिसत आहे. पावसाअभावी यंदा शेतीची कामेही रखडली होती व त्यामुळे रोवणीही लांबली.मात्र आॅगस्ट महिन्यात पावसाने जोर धरला व त्यातही मागील आठवडाभरापासून बरसत असलेल्या संततधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले आहे. या पावसामुळे जिल्ह्यात पूर परिस्थितीही निर्माण झाली होती. शिवाय पावसामुळे शेतकरीही सुखावला आहे. असे असतानाच मात्र जिल्ह्यात पाहिजे तेवढा पाऊस पडलेला नसून त्यामुळे तूट असल्याचेही तेवढेच खरे आहे.जिल्ह्यात सोमवारपर्यंत (दि.१७) ९११.३ सरासरी पाऊस अपेक्षित आहे. मात्र अद्याप फक्त ६३५.७५ एवढा सरासरी पाऊस बरसल्याची नोंद आहे. म्हणजेच, आतापर्यंत २७५.५६ एवढ्या सरासरी पावसाची तूट दिसून येत आहे. आता एका दिवसावर पोळा आला असून ‘पोळा आणि पाणी झाला भोळा’ असे म्हटले जाते. यावरून आता ही तूट भरून काढण्यासाठी जिल्ह्यात दमदार पावसाची गरज आहे.सर्वाधिक पाऊस गोरेगाव तालुक्यातजिल्ह्यात आतापर्यंत ६३५.७४ एवढ्या सरासरी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. यात सर्वाधिक पाऊस गोरेगाव तालुक्यात २७०२.३५ मीमी पडला असून त्याची सरासरी ९००.७८ एवढी आहे. तर गोंदिया तालुक्यात ३७२८.३० मीमी (५३२.६१), तिरोडा तालुक्यात २९६७.७७ मीमी. (५९३.५५), अर्जुनी-मोरगाव तालुक्यात २८६२.९० मीमी. (५७२.५८), देवरी तालुक्यात १५६१.०७ मीमी (५२०.३६), आमगाव तालुक्यात २९५२.३० मीमी. (७३८.०८), सालेकसा तालुक्यात १५५१.५० मीमी. (५१७.१७) तर सडक-अर्जुनी तालुक्यात २६५३.३८ मीमी. (८८४.४६) पाऊस बरसल्याची नोंद घेण्यात आली आहे.

टॅग्स :Rainपाऊस