प्रभू ने जे दिले त्यातील थोडे समर्पण करा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:34 AM2021-01-16T04:34:25+5:302021-01-16T04:34:25+5:30

गोंदिया : अयोध्येतील पावनभूमीवर प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर साकारणार असून हे राष्ट्रमंदिर असणार आहे. यासाठी समाजातील प्रत्येकाने आपला हातभार ...

Dedicate a little of what the Lord has given () | प्रभू ने जे दिले त्यातील थोडे समर्पण करा ()

प्रभू ने जे दिले त्यातील थोडे समर्पण करा ()

Next

गोंदिया : अयोध्येतील पावनभूमीवर प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर साकारणार असून हे राष्ट्रमंदिर असणार आहे. यासाठी समाजातील प्रत्येकाने आपला हातभार लावणे गरजेचे आहे. आज जे काही आपल्याकडे आहे, ते सर्व प्रभूने आपल्याला दिलेले आहे. त्यातील परिश्रमाने कमावलेले थोडे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्रासाठी समर्पण करावे, असे आवाहन अखंड आश्रमाचे पंडित शैलेशजी महाराज यांनी केले.

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र निधी संकलन महाअभियानाच्या शुभारंभ प्रसंगी निधी संकलन कार्यालयात शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात बोलत ते होते.

यावेळी नगराध्यक्ष अशोक इंगळे, समाजसेवी हुकुमचंद अग्रवाल, बजरंग दलाचे क्षेत्रीय संयोजक देवेश मिश्रा, विहिंपचे जिल्हाध्यक्ष भिकम शर्मा, निधी संकलन अभियानाचे जिल्हा संयोजक सचिन चौरसिया उपस्थित होते. प्रभू श्रीरामाच्या पूजनाने व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी श्रीराम मंदिरासाठी निधी संकलन अभियानाबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना सर्वच समर्पण करणारे व या पावन कार्यात हातभार लावणारे सौभाग्यशाली असल्याचे सांगितले. पंडित शैलेश महाराज व उपस्थित मान्यवरांच्याद्वारे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ग्राम, बस्ती, गृह संपर्क महाअभियानाचा कार्यालयातून प्रारंभ करण्यात आला. यावेळी निधी संकलनासाठी नगरात निघालेल्या समितीला प्रथम समर्पण शहराचे युवा उद्योगपती रोशन जायस्वाल यांनी दिला. त्यांनी एक लक्ष अकरा हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश पं. शैलेश महाराज व उपस्थित मान्यवरांना सोपवून शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी भिकम शर्मा यांनी एक लक्ष, नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी ५१ हजार व इतर सहा मान्यवर दानदात्यांनी प्रत्येकी २१ हजाराचे धनादेश समितीला सोपविले. या वेळी समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Web Title: Dedicate a little of what the Lord has given ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.