शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

विंधन विहिरींमुळे पाण्याच्या पातळीत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 22:07 IST

अत्यंत कमी वेळात कमी जागेत कमी खर्चात तयार होणाऱ्या विंधन विहिरींकडे नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामध्ये पाण्याचे पुनर्भरण लवकर होत असल्याने पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोल जात असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देवापर वाढला: विंधन विहिरींचे खोदकाम जोमात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अत्यंत कमी वेळात कमी जागेत कमी खर्चात तयार होणाऱ्या विंधन विहिरींकडे नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामध्ये पाण्याचे पुनर्भरण लवकर होत असल्याने पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोल जात असल्याचे चित्र आहे.पूर्वी पाण्याचे साधन म्हणून विहीर खोदण्याकडे नागरिकांचा अधिक भर होता. कालांतराने आता विहीर खोदण्यासाठी लागणारी मोकळी जागा, विहीर खोदल्यानंतर विहिरीतून निघणारी माती व त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न यातूनच विंधन विहीर खोदण्याकडे नागरिकांचा कल वाढलेला दिसून येतो. विंधन विहिरीमधून निघणारे पाणी शुद्ध व आरोग्यास हानीकारक राहत नसल्याने विहिरीस पर्याय म्हणून जिल्ह्यात ठिक-ठिकाणी हातपंप खोदकामास सुरूवात झाली आहे.विहीर उभारण्यासाठी भुपृष्टावर जवळपास ४० ते ६० फुट पर्यंत खोदकाम करावे लागते. मात्र विंधन विहीर खोदण्याकरीता फार अल्पशी जागा लागत असून त्वरीत पाण्याचा उपसा सुरू होतो. हातपंपावर मोटारपंप बसवून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपशा केला जात असल्यामुळे भुगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.पावसाळ्यात पडलेले पाणी विहिरीमध्ये थेट जमा होते. मात्र हात पंपाचे तसे नाही पावसाचे पडलेले पाणी सहजासहजी हातपंपात मुरतच नाही. पावसाचे पाणी ४० ते ५० फूटापर्यंत झिरण्यासाठी कित्येक वर्षाचा कालावधी लागतो तत्पूर्ती जमीनीतील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा झाला असल्याने पाण्याची पातळी खाली गेलेली आहे. विहिरीमधील पाणी व हातपंपामधील पाणी उपसा झाल्यानंतर परिसरातील पाण्याच्या पातळीवर विपरीत परिणाम होत असल्याचे आढळून आले आहे. भुगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत असल्याने सध्या उभारण्यात येणाºया हातपंपासाठी आणखी खोल खोदावे लागत आहे.काही वर्षापूर्वी १५ ते २० फुटावर वाटेल तसे मुबलक पाणी विहिरींना लागत होते. परंतु आता भुगर्भातील पाण्याची पातळी कमी झाल्याने विहीर खोदने फार कमी झाले आहे. तसेच हातपंपासाठी ही जास्तीतजास्त खोदावे लागत आहे.या प्रकारावर वेळीच लक्ष दिले नाही तर काही वर्षात या भागात पाण्याकरीता हाहाकार होण्याची चिन्हे आता पासुनच दिसून येत असून उपाययोजनेची गरज आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई