शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
3
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
4
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
5
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
6
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
7
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
9
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
10
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
11
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
12
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
13
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
14
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
16
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
17
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
18
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
19
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
20
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी

ॲक्टिव्ह रुग्णांमधील एकाची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2021 05:00 IST

मध्यंतरी जिल्ह्यातील बाधितांची संख्या वाढताना दिसून आली व थेट ९ एक्टिव्ह रुग्ण झाले होते. यामुळे ऐन सणासुदीच्या काळात कोरोना पुन्हा पाय पसरणार असे वाटू लागले होते. मात्र मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात नवीन बाधिताची नोंद झालेली नाही. नवरात्रीतही बाधित न वाढल्याने जिल्हावासीयांना तेवढाच दिलासा होता. मात्र जिल्ह्यात ४ एक्टिव्ह रुग्ण होते. आता शनिवारी (दि.१६) जिल्ह्यात नवीन बाधिताची नोंद नसतानाच एका एक्टिव्ह रुग्णाने कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता ३ एक्टिव्ह रुग्ण उरले आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नवीन बाधिताची नोंद नसल्याने जिल्हावासीयांना दिलासादायक वातावरण असतानाच शनिवारी (दि.१६) जिल्ह्यातील एक्टिव्ह रुग्णांमधील एकाने कोरोनावर मात केली आहे. त्यानंतर आता जिल्ह्यात ३ एक्टिव्ह रुग्ण उरले असून नवीन बाधिताची नोंद नसल्याने परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र तरीही नागरिकांनी गर्दी टाळता नियमांचे पालन करण्याची गरज आहेच.मध्यंतरी जिल्ह्यातील बाधितांची संख्या वाढताना दिसून आली व थेट ९ एक्टिव्ह रुग्ण झाले होते. यामुळे ऐन सणासुदीच्या काळात कोरोना पुन्हा पाय पसरणार असे वाटू लागले होते. मात्र मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात नवीन बाधिताची नोंद झालेली नाही. नवरात्रीतही बाधित न वाढल्याने जिल्हावासीयांना तेवढाच दिलासा होता. मात्र जिल्ह्यात ४ एक्टिव्ह रुग्ण होते. आता शनिवारी (दि.१६) जिल्ह्यात नवीन बाधिताची नोंद नसतानाच एका एक्टिव्ह रुग्णाने कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता ३ एक्टिव्ह रुग्ण उरले आहेत. आता नवरात्री संपली असून एवढ्या गर्दीतही कोरोनाला पाय पसरता आले नाही ही दिलासादायक बाब आहे. मात्र पुढे दिवाळी असून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात गर्दी वाढणार आहे. अशात नागरिकांनी उगाच धोका पत्करण्यापेक्षा नियमांचे पालन करूनच दिवाळीची खरेदी करण्यासाठी बाहेर पडण्याची गरज आहे. तसेच दुकानदारांनी स्वत:सह ग्राहकांच्या सुरक्षेसाठी नियमांचे पालन करूनच व्यापार करणे सुरक्षित राहील. जिल्ह्यात लागले १२२९५१० डोस - जिल्ह्यात लसीकरण जोमात असून आतापर्यंत १२२९५१० ड़ोसचे लसीकरण करण्यात आले आहेत. यामध्ये ८२६५९२ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून ४१७९६० नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. मात्र त्यानंतरही कित्येक नागरिक लसीकरण टाळताना दिसत आहे. मात्र लस घेऊनच आपण कोरोनापासून सुरक्षित राहू शकतो हे स्पष्ट झाले आहे. प्रत्येकाने लस घेणे गरजेचे आहे. ९८ चाचण्या निगेटिव्ह - जिल्ह्यात आतापर्यंत ४५८७३५ चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यामध्ये २३७०२६ आरटी-पीसीआर चाचण्या असून २२१७०९ रॅपिड ॲंटिजन चाचण्या आहेत. तर शुक्रवारी ९८ चाचण्या घेण्यात आल्या असून त्यात एकही बाधित आढळलेला नसल्याने शनिवारीही नवीन बाधिताची नोंद घेण्यात आलेली नाही.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या