शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
2
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
3
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
4
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
5
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
6
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
7
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
8
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
9
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
10
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
11
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
12
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
13
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
14
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
15
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
16
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
17
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
18
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
19
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
20
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली

देवरीत समृद्ध सुकन्या योजनेचा शुभारंभ

By admin | Updated: January 5, 2016 02:09 IST

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानांतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींकडून सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री समृद्ध सुकन्या

देवरी : ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानांतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींकडून सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री समृद्ध सुकन्या योजनेचा शुभारंभ रविवारी (दि.३) सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात करण्यात आला.देवरी तालुका भाजप महिला आघाडी व माजी महिला बालकल्याण सभापती सविता पुराम यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार व दीप प्रज्वलित करुन करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सभापती देवकी मरई, माजी जिल्हा परिषद सभापती सविता पुराम, पंचायत समिती सदस्य सुनंदा बहेकार, नगरसेविका कौशल्या कुंभरे, गीता भेलावे, कोकीळा दखने, भूमिता बागडे, सुनिता गावळ, संतोष तिवारी, संजू उईके मंचावर उपस्थित होते.यावेळी नारी शक्तीला सलाम करीत भाजप महिला पदाधिकाऱ्यांचा शाल व श्रीफळ देवून आ. पुराम व सविता पुराम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आ. पुराम यांनी, शिक्षेची आद्यदेवता म्हणून सावित्रीबाईची ओळख आहे. जर त्यांनी महिलांना शिकविले नसते तर आज देशात महिला समोर गेल्या नसत्या. आज सर्व महिलांनी त्यांचा आदर्श घेवून सामाजिक कार्य केले पाहिजे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या आयोजिका माजी सभापती पुराम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तसेच महिलांना सुकन्या योजनेविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी उपस्थित महिलाांनी सुकन्या योजनेकरिता आपल्या मुलींचे फार्म भरुन घेतले. संचालन प्रविण दहीकर यांनी केले. कार्यक्रमासाठी तालुका भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)