लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : स्थानिक ग्रामीण रुग्णालय विविध कारनाम्यांमुळे सदैव प्रकाश झोतात असते. शुक्रवारी रात्री डॉक्टर उपलब्ध नसल्याने चक्क एका रुग्णाला जीव गमवावा लागल्याची घटना घडली. विशेष म्हणजे या रु ग्णाची रु ग्णालयाच्या दस्तावेजात नोंदच नाही.या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे.स्थानिक ग्रामीण रूग्णालयात अनेक गैरसोयी आहेत. येथे नावाला कागदोपत्री चार डॉक्टर आहेत. मात्र वेळेवर उपलब्ध राहात नाही. वैद्यकीय अधीक्षक हे आठवड्यातून एखादे वेळी असले तर असतात.अन्यथा हे रूग्णालय रामभरोसेच असते.दुसरे डॉक्टर स्वताच्या खासगी रुग्णालयातच मश्गूल असतात.रुग्णालयातून कॉल आला तर जातात. अन्यथा त्यांचा इतर वेळ स्वत:च्या खासगी रुग्णालयातच जातो. शुक्र वारी रात्री सुमारे १२ वाजता अर्जुनी मोरगाव येथील ऋषी चांदेवार यांची प्रकृती बिघडली. त्यांना एका खासगी रूग्णालयातून ऑक्सीजन नसल्यामुळे ग्रामीण रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरच उपलब्ध नव्हते.रूग्णालयाचे इतर कर्मचारी हात लावायला तयार नाही.त्यांच्यासोबत असलेल्यांना रुग्ण दगावल्याची शंका आली.मात्र डॉक्टरच नसल्यामुळे मृत्यू घोषित कोण करणार? हा प्रश्न निर्माण झाला.या वेळी १०८ रूग्णवाहिकेवरील डॉ.कापगते व डॉ.रहेले उपस्थित होते.पण ते विनंतीखातर आले होते. ऑनड्युटी डॉक्टर हजर नसल्याने ते मृत्यू घोषित करू शकत नव्हते.अखेर चांदेवार यांच्या नातेवाईकांनी त्यांना घरी घेऊन गेले. दरम्यानच्या काळात रूग्णालय कर्मचाऱ्यांनी आॅनड्युटी असलेल्या डॉक्टरांना बरेच कॉल केले. मात्र त्यांनी प्रतिसादच दिला नाही. ही सर्व घडामोड रूग्णालयाच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असेल. या रूग्णालयात इलेक्ट्रॉनिक हजेरी मशीन उपलब्ध आहे. मात्र डॉक्टर हजर राहात नसल्याने त्याचा वापर हेतुपुरस्सर केलाच जात नव्हता.या रूग्णालयावर कुणाचेच नियंत्रण नाही. अनेक तक्र ारी होऊनही कुणीच लक्ष देत नाही.त्यामुळे असले प्रकार सातत्याने घडतात. काही प्रकार उजेडात येतात तर अनेक प्रकार जनता मुकाट्याने सहन करते. गोंदिया येथील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सूचना न देता येथे अकस्मात भेट दिल्यास डॉक्टरांच्या अनुपस्थितीचे बिंग फुटू शकते. गोरगरिबांना सेवा मिळाली नाही तरी चालेल मात्र मांजराच्या गळ्याला घंटा बांधणार कोण? अशी वरिष्ठांची धारणा असल्यामुळे असले प्रकार घडत असल्याचा जनतेचा आरोप आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.
डॉक्टर नसल्याने रु ग्णाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 06:00 IST
ऑनड्युटी डॉक्टर हजर नसल्याने ते मृत्यू घोषित करू शकत नव्हते.अखेर चांदेवार यांच्या नातेवाईकांनी त्यांना घरी घेऊन गेले. दरम्यानच्या काळात रूग्णालय कर्मचाऱ्यांनी आॅनड्युटी असलेल्या डॉक्टरांना बरेच कॉल केले. मात्र त्यांनी प्रतिसादच दिला नाही. ही सर्व घडामोड रूग्णालयाच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असेल.
डॉक्टर नसल्याने रु ग्णाचा मृत्यू
ठळक मुद्देप्रशासनाचा कानाडोळा: शहरवासीयांची ओरड,आरोग्य विभागाची डोळेझाक