शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

विवाह संस्कार सोहळ्यातून दिला बेटी बचावचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 22:34 IST

येथील श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सेवक कुलदीप लांजेवार या तरूणाने आपल्या विवाह संस्कार सोहळ्यातून सामाजिक बांधिलकीचा कार्य म्हणून बेटी बचाओ, बेटी पढाओ तसेच स्वच्छ भारतचा संदेश दिला.आजच्या आधुनिक काळात संत महापुरुषांच्या विचारांचा आदर्श ठेऊन हा विवाह संस्कार सोहळा साजरा करण्यात आला. त्यामुळे या आगळ्या वेगळ्या विवाह सोहळ्याची परिसरात चर्चा होत आहे.

ठळक मुद्देअवास्तव खर्चाला फाटा : पाठ्यपुस्तकांची शाळांना मदत, स्वच्छतादूतांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : येथील श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सेवक कुलदीप लांजेवार या तरूणाने आपल्या विवाह संस्कार सोहळ्यातून सामाजिक बांधिलकीचा कार्य म्हणून बेटी बचाओ, बेटी पढाओ तसेच स्वच्छ भारतचा संदेश दिला.आजच्या आधुनिक काळात संत महापुरुषांच्या विचारांचा आदर्श ठेऊन हा विवाह संस्कार सोहळा साजरा करण्यात आला. त्यामुळे या आगळ्या वेगळ्या विवाह सोहळ्याची परिसरात चर्चा होत आहे.राष्टÑसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने या विवाह संस्कार सोहळ्याला सुरूवात करण्यात आली. या वेळी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा आश्रम मोझरी, जि. अमरावती येथील प्रबोधनकार हभप. लक्ष्मणदास काळे महाराज, राष्टÑसंत विचाराचे ज्येष्ठ अभ्यासक ज्ञानेश्वर रक्षक, राष्टÑीय युवा कीर्तनकार प्रशांत ठाकरे, विजय वाहीकर उपस्थित होते.यावेळी श्री गुरुदेव पद्धतीने देशभक्ती, समाजपयोगी मंगलाष्टकांनी विवाह संस्काराची सुरुवात झाली. सोबतच शुभाशिर्वाद देण्यासाठी आलेल्या वºहाड्यांना व राष्टÑसंतानी रचलेल्या सामुदायिक ध्यान व प्रार्थनेची पुस्तक नवदांपत्याकडून देण्यात आली. विवाह संस्कार सोहळ्यात येणाऱ्या पाहुण्यांचे बेटी बचाओ बेटी पढाओ व सप्तपदी स्वच्छतेची चा संदेश देणारे बॅचेस लाऊन एका अनोख्या स्वरुपात स्वागत करण्यात आले. विवाह संस्कार सोहळ्याच्या आयोजनात कुठलाही व्यर्थ खर्च न करता कमी खर्चात आदर्श विवाह संस्कार कसा संपन्न होऊ शकतो याचा संदेश देण्यात आला.विवाह संस्कार सोहळ्याचे महत्त्व मान्यवरांकडून मार्गदर्शन करीत अशा विवाह संस्कार सोहळ्याच्या आवश्यकता का? यावर सुद्धा मार्गदर्शन करण्यात आले. या आधुनिक काळात विवाह संस्कारात फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे प्रदूषण केले जाते शिवाय पैशांचा सुध्दा अपव्यय केला जातो.असा कुठलाही प्रकार या विवाहसोहळ्या दरम्यान करण्यात आला नाही. वर आणि वधुचे पोषाखावर कुठलाही निष्फळ खर्च न करता साध्या भारतीय वेषात विवाह संस्कार सोहळा पार पडला.या विवाह सोहळ्यात देवरी स्वच्छता दुतांचा नवदापत्यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.भेटवस्तूंच्या स्वरूपात दिली पुस्तकेया विवाह सभारंभात भेटवस्तूच्या स्वरुपात शैक्षणिक साहित्य व पुस्तके देण्याचे आवाहन नवदांपत्याकडून करण्यात आले होते. पाहुण्यांकडून अनेक शैक्षणिक साहित्य, पुस्तके भेटवस्तूच्या स्वरुपात मिळाले. चालू शैक्षणिक वर्षात शाळा व ग्रंथालयांना त्याचे वितरण करण्यात येणार आहे. असा आदर्श विवाह संस्कार सोहळ्याचे आयोजन प्रत्येक परिवाराने करुन एक आदर्श समाज घडविण्यासाठी नवदांपत्यांनी सहकार्य केले.वºहाड्यांना सामुदायिक प्रार्थनेचे पुस्तकलग्न सोहळ्यात शुभाशिर्वाद देण्यासाठी आलेल्या वऱ्हाड्यांना व राष्ट्रसंतानी रचलेल्या सामुदायिक ध्यान व प्रार्थनेची पुस्तक नवदांपत्याकडून देण्यात आली. विवाह संस्कार सोहळ्यात येणाऱ्या पाहुण्यांचे बेटी बचाओ बेटी पढाओ व सप्तपदी स्वच्छतेची चा संदेश देणारे बॅचेस लाऊन एका अनोख्या स्वरुपात स्वागत करण्यात आले.असा परिवर्तनवादी विवाह सोहळा कर्मकांड विरहित करण्याचे धाडस या नवदापंत्यांनी दाखवल. कुलदीप लांजेवार तरुणाची कल्पकता, हिम्मत ही निश्चित बोहल्यावर चढणाऱ्या तरुण मित्रांना प्रेरणा देईल. पुन्हा एकदा या क्रांतीकारी सत्कार्याला जयगुरू.- ज्ञानेश्वर रक्षक, प्रवर्तक श्रीगुरूदेव युवामंच.